Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशपॅलेस्टाइनमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

पॅलेस्टाइनमध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

दिल्ली | Delhi

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine war) यांच्यात गेल्या १२ दिवसांपासून युद्धाचा संघर्ष सुरु असताना भारतासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

पॅलेस्टाइनमध्ये (Palestine) भारतीय दुतावासातील (Indian embassy) अधिकारी मुकुल आर्य (Mukul Arya) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ते दूतावासाच्या इमारतीतच मृतावस्थेत आढळले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पॅलेस्टाइन सरकारने (Palestine govt) दिले आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Dr. S. Jaishankar) यांनी आर्य यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे. एस. जयशंकर यांनी ट्वीट करून म्हटले की, पॅलेस्टाइनमधील भारतीय प्रतिनिधी मुकुल आर्य यांच्या निधनाच्या वृत्ताने धक्का बसला आहे. ते एक प्रतिभावान अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि मित्र परिवाराच्या दु:खात सहभागी आहे.

मुकुल आर्य यांनी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयातही कामं केलं होतं. ते २००८ सालच्या बॅचचे अधिकारी होते. त्यांनी काबूल आणि मॉस्कोमध्येही भारतीय दूतावासात काम केलं होतं. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत भरती होण्याअगोदर दिल्ली विश्वविद्यापीठ आणि जवाहरलाल विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या