Sunday, January 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात मुसळधार पाऊस सुरु असतानाच हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना दिलासादायक बातमी; तर...

राज्यात मुसळधार पाऊस सुरु असतानाच हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना दिलासादायक बातमी; तर ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

मुंबई | Mumbai
राज्यात पावसाने कहर माजवलेला बघायला मिळत आहे. अनेक भागात रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेती पिक पूर्णपणे उध्वस्थ झाले आहे. पुरामध्ये शेतीमधील पिकच नाही तर धान्य कपडे आणि संसार वाहून गेला. शेतकऱ्यांचा हातात काहीच शिल्लक राहिले नाही. आभाळ फाटल्यासारखा पाऊस सुरू आहे. या पावसाळ्यात आतापर्यंत मराठवाड्यातील तब्बल २८५७ गावांतील शेती बाधित झाली आहे. आत्तापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागांत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला पाचारण करावे लागले. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. राज्यात असलेल्या डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे त्यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे.

पुढील २४ तासांत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र कमजोर होणार
राज्यात असलेल्या डिप्रेशनचे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले आहे त्याचबरोबर ते पुढील २४ तासांत आणखी कमजोर होणार आहे, अशात राज्यातील पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, कमी दाबाचे क्षेत्र २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पश्चिमेकडे सरकत उत्तर महाराष्ट्र, दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्राच्या भागातून पुढे जाईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. १ ऑक्टोबरपर्यंत हे क्षेत्र गुजरात किनाऱ्याजवळ ईशान्य अरबी समुद्रात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान खात्याकडून उत्तर महाराष्ट्राला अलर्ट
मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट आम्ही जारी केला आहे, डिप्रेशन परावर्तित झालंय आणि ते आत्ता अतीतीव्र कमी दाबाचे क्षेत्र झाले आहे. आत्ता ही सिस्टीम उत्तर महाराष्ट्रावर आहे. अशात, धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज देखील नाशिक आणि घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईवरील पावसाचा जोर उद्या कमी होईल. मराठवाड्यात पुढील २-३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही, मात्र पूर परिस्थिती असल्याने अडचणींचा सामना होऊ शकतो.

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 866 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता पुढील वर्षीच?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्या ना कोणत्या कारणाने रखडत लांबल्याचे दिसत आहेत. यामुळे नगर जिल्ह्यात मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही लांबणीवर पडणार असून...