Saturday, September 21, 2024
Homeदेश विदेशIndian Navy Day 2022 : काय आहे 'भारतीय नौदल दिना'चा इतिहास?

Indian Navy Day 2022 : काय आहे ‘भारतीय नौदल दिना’चा इतिहास?

देशाच्या तीन सशस्त्र दलांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलासाठी आजचा दिवस खास आहे. आज भारतीय नौदल दिन (Indian Navy Day 2022) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

- Advertisement -

देशात दरवर्षी ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा केला जातो. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौसैनिकांच्या सन्मानार्थ हा विशेष दिवस साजरा केला जातो.

१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध जिंकलेल्या भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्य लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो.

४ डिसेंबर १९७१ रोजी ‘ऑपरेशन ट्रायडंट’ अंतर्गत भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या कराची नौदल तळावर हल्ला केला.

या ऑपरेशनचे यश लक्षात घेऊन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा केला जातो. जंग-ए-आझादी, मुंबईतील ऑपरेशन ताजपासून ते इतर अनेक घटनांपर्यंत भारतीय नौदलाचा इतिहास कर्तृत्वाने भरलेला आहे.

भारतीय नौदलाची स्थापना १६१२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. नंतर त्याला रॉयल इंडिया नेव्ही असे नाव देण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतर १९५० मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली.

आजच्या दिवशी मॅरेथॉन, आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, एअर डिस्प्ले आणि टॅटू समारंभ यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या