Thursday, May 15, 2025
Homeक्रीडाआयपीएल IPL लवकरच सुरू होणार !

आयपीएल IPL लवकरच सुरू होणार !

दिल्ली । Delhi

- Advertisement -

करोनाचा फटका अनेक स्पर्धांना देखील बसला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या तसेच ऑक्टोबर – नोव्हेंबर’मध्ये होणारा टी20 विश्वचषक स्थगित करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ICC ने घेतला आहे. पण यावर्षीची इंडियन प्रीमियर लीग IPL च्या तेराव्या सिझनची सुरुवात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती एएनआय ANI या वृत्त संस्थेने दिली आहे.

यावर्षीची आयपीएल IPL 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमीरातमध्ये सुरु होऊ शकते. तर आयपीएलची फायनल आठ नोव्हेंबरला होऊ शकते. तसेच यंदाचा सिझन 51 दिवसांचा असण्याची शक्यता आहे. आयपीएल व्यवस्थापन परिषदेची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे, या बैठकीत आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआय BCCI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...