Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशIRCTC Ticket Booking : IRCTC च्या तिकीट बुकिंग वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड ;...

IRCTC Ticket Booking : IRCTC च्या तिकीट बुकिंग वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड ; अनेक प्रवाशांचे हाल

नवी दिल्ली | New Delhi

तुम्ही रेल्वेचे ऑनलाईन तिकीट काढणार (Railway Online Ticket Booking) आहे का?तर थांबा.. ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गेल्या १० तासांपासून ही आयआरसीटीसीची वेबसाईट (IRCTC Website) आणि ॲप दोन्ही बंद आहेत. या वेबसाईटवरुन तिकीट बुकिंसाठी पेमेंट करता येत नाही. त्यामुळे देशभरातील लाखो रेल्वे प्रवाशांना तिकीट बुक करताना समस्या येत आहे (Online Ticket Booking Error).

- Advertisement -

IRCTC सर्व्हर डाउन झाले असून IRCTC ने ट्विट करून ही माहिती लोकांना दिली आहे. कंपनीने म्हटले की मेंटेनन्स ॲक्टिव्हिटीमुळे तिकिटांचे बुकिंग होऊ शकत नाहीये.तिकीटासाठीची रक्कम भरतेवेळी येणाऱ्या या अडचणींवर सध्या काम सुरु असून, लवकरात लवकर ही सेवा पूर्ववत करण्याकडे रेल्वे विभागाचा कल दिसून येत आहे.

Rain Alert : ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून अलर्ट जारी

आयआरसीटीसीकडून प्रवाशांना तिकीट बुकींगदरम्यान रक्कम भरण्यासाठी E Wallet चा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शिवाय तिकीटांच्या बुकींगसाठी Ask Disha हा पर्याय निवडण्याची विचारणाही केली जात आहे. शिवाय तुम्ही रेल्वे स्थानकांवर थेट तिकीट खिडकी गाठूनही प्रवासासाठीचं तिकीट बुक करू शकता.

आयआरसीटीसीने प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी आणखी काही पर्याय दिले आहेत.’पर्यायाने Amazon, Makemytrip इत्यादी इतर B2C प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला तिकीट बुक करता येईल.’, असे आयआरसीटीसीने सांगितले आहे. तसंच ही तांत्रिक अडचण सोडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तांत्रिक अडचण दूर होताच माहिती दिली जाईल, असे देखील सांगण्यात आले आहे.

ठाकरे पिता-पुत्र मैदानात; मनसे ‘कमबॅक’च्या तयारीत

याआधी ६ मे रोजी IRCTC ची सेवा ठप्प झाली होती त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्या काळातही साईट डाऊन झाल्यामुळे मेंटेनन्सचा हवाला देण्यात आला होता. दरम्यान, आयआरसीटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्रीपासून साइट बंद आहे. ते सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या, रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांच्या बुकिंगमध्ये IRCTC चा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आहे. IRCTC अॅप आणि साइट स्टॉल झाल्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे. काही लोकांनी आयआरसीटीसीला टॅग करून ट्विट केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या