Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRupee Falls: रुपयाच्या गटांगळ्या सुरुच; डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सर्वकालीन निच्चाकांवर

Rupee Falls: रुपयाच्या गटांगळ्या सुरुच; डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सर्वकालीन निच्चाकांवर

मुंबई | Mumbai
भारतीय रुपयाची घसरण थांबण्याचे नाव घेत नसून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया कमकुवत झाला. यामुळे रुपया आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी म्हणजेच ९६.२१ या विक्रमी निच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. हे सलग पाचवे सत्र आहे ज्यात रुपयाने नवीन सर्वकालीन नीचांक गाठला आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकन बाँड यील्डमधील वाढीमुळे भारतीय चलनावर आणखी दबाव वाढला आहे. चालू वर्षात रुपया तब्बल ७ टक्क्यांनी घसरला आहे.

रुपया ऐतिहासिक निच्चांकी तळावर
भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. भारतात ८८ टक्के कच्चा तेलाची निर्यात होते, त्यामुळे, जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आणि रुपयावर होतो. यावेळीही असेच घडले आहे. इराण युद्धापासून रुपया सुमारे 5.5 टक्के कमकुवत झाला असून, तो आशियातील सर्वात खराब कामगिरी करणारे चलन बनला आहे.

- Advertisement -

NEET Paper Leak Case : आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

परदेशी गुंतवणूकदारांची शेअर बाजारातून एक्झिट
परदेशी गुंतवणूकदारांनी (एफपीआय) या महिन्यात (मे) आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. या ताज्या विक्रीच्या लाटेमुळे, 2026 मधील आतापर्यंतचा एकूण बहिर्वाह 2.2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे, जो 2025 मधील एकूण विक्रीपेक्षाही अधिक आहे.

रुपया पडण्यामागे प्रमुख कारणं
१) कच्च्या तेलाचा भडका : इराण-अमेरिका शांतता करार लांबल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव १०९ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेला आहे. भारत आपल्या गरजेच्या ८५% कच्चे तेल आयात करतो. तेल महागल्याने भारताचे आयात बिल वाढले असून डॉलरची मागणी प्रचंड वाढली आहे.

२) मजबूत अमेरिकन डॉलर : अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात लवकर कपात करण्याची मावळली आहे. परिणामी, विदेशी गुंतवणूकदारांना डॉलरमधील गुंतवणूक वाढवत असून डॉलर इंडेक्स सातत्याने मजबूत होत आहे.

३) इराण संकट आणि भू राजकीय तणाव : अमेरिका आणि इराणमधील वाद विकोपाला गेला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. इराणने संयुक्त अरब अमिरातीजवळ एक जहाज जप्त केल्याच्या वृत्ताने बाजारात भीतीचे वातावरण आहे.

४) आयात बिल आणि महागाई : महागड्या तेलामुळे देशात आज पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत महागाई वाढणार असल्याने चालू खात्यातील तूट वाढण्याची भीती आहे. सरकारने आयात दबाव कमी करण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क वाढवले आहे.

ताज्या बातम्या

नांदगावला पावसाची हजेरी

0
नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon सूर्य आग ओकत असताना सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. बुधवारी सकाळपासूनच कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण होते. आज सकाळ...