नवी दिल्ली | New Delhi
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (19th Asian Games) भारताची पदाकांची लयलुट सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. काल भारताची नेमबाज सिफ्ट कौर सामराने (Shooter Sift Kaur Samra) ५० मीटर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक तर नेमबाज आशी चौक्सीने कांस्यपदक मिळवले होते. त्यानंतर आज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवसाची सुरुवात भारताने सुवर्णपदक जिंकत केली आहे…
Accident News : मुंबई-आग्रा महामार्गावर एसटी-कंटेनरचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू; ४ जखमी
आशियाई क्रीडा २०२३ च्या स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. तर दोन नेमबाजांनी वैयक्तिक अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताकडून सरबजोत सिंग, अर्जुन सिंग चीमा आणि शिवा नरवाल यांनी अंतिम फेरीत चीनचा पराभव करून अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये सरबजोत आणि अर्जुन सिंग यांनी अनुक्रमे पाचवा आणि आठवा क्रमांक पटकावला आहे. यामुळे हे दोघेही वैयक्तिक शूटिंगमध्ये अंतिम फेरीत पोहोचले असून आता या दोघांनाही वैयक्तिक क्रीडाप्रकारात पदक मिळण्याची आशा आहे.
Accident News : भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू
दरम्यान, भारताच्या खात्यात आतापर्यंत ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ८ कांस्यपदकांसह एकूण २१ पदकांची भर पडली आहे. तसेच आज भारताच्या रोशिबिना देवी हिने वुशू क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळवले आहे. रोशिबिना देवी हि ६० किलो अंतिम चीनच्या डब्ल्यूयू झियाओवेईकडून पराभूत झाली. अंतिम फेरीत तिचा २-० असा पराभव झाला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.