Sunday, September 29, 2024
Homeक्रीडाIND vs BAN T20 Series : बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

IND vs BAN T20 Series : बांगलादेशविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

'यांना' मिळाली संधी

मुबंई | Mumbai

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील कसोटी क्रिकेट मालिका (Test Series) सुरू आहे. अशातच काल शनिवार (दि. २८ सप्टेंबर २०२४) रोजी बांगलादेश विरूध्दच्या टी २० मालिकेसाठी (T20 Series) भारतीय संघाची घोषणा (Indian Team) करण्यात आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Sharad Pawar On Rohit Pawar : “त्याची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची…”; शरद पवारांकडून रोहित पवारांबाबत मोठे संकेत

भारतीय संघनिवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यात संघाची धुरा सुर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) सोपविण्यात आली आहे. तर भारतीय संघनिवड समितीने आयपीएल २०२४ (IPL 2024) मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मयंक यादव आणि नितीश कुमार रेड्डी यांना पदार्पण करण्याची संधी दिली आहे.

हे देखील वाचा : PM Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन; विरोधकांवर साधला निशाणा, म्हणाले…

तसेच या संघामध्ये कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा फिरकी गोलंदाज वरूण चक्रवर्तीचे संघात कमबॅक झाले आहे.याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा संघात परतला आहे. तर वर्कलोड मॅनेजमेंटमुळे शुभमन गील, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव या वरीष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Political Special : महायुतीकडून जातीय समीकरण राखण्याचा प्रयत्न

टी २० मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे

सुर्यकुमार यादव (कर्णधार) रिंकुसिंग, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर,वरूण चक्रवर्ती,रवी बिश्नोई,जितेश शर्मा, अर्शदिप सिंग,मयंक यादव आणि हर्षित राणा

सलिल परांजपे, नाशिक.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या