नाशिक | Nashik
भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ च्या अंतिम सामन्यात सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात श्रीलंका संघाला अंतिम फेरीत १४७ धावांनी पराभूत करून सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. या विजयासह त्यांनी इतिहास रचला आहे. तसेच भारतीय संघाचा टी 20मधील सर्वात मोठा विजय संपादन केला.
टॉस जिंकून कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २१६ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर स्मृती मंधनाने अवघ्या ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण करत ७९ धावांची तुफानी खेळी केली. तर शेफाली वर्माने ४८ धावा आणि रिचा घोषने २२ चेंडूत नाबाद ४९ धावा करत २१६ धावांचा डोंगर उभा केला.
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल
श्रीलंकेचा संघ पत्यासारखा कोसळला
२१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेचे फलंदाज सुरुवातीपासूनच दबावात दिसले. सलामीवीर इमेशा दुलानी १० चेंडूंत ३ धावा करून बाद झाली. त्यानंतर हसिनी परेरा खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतली. श्रीलंकेसाठी कर्णधार चमारी अट्टापट्टूने सर्वाधिक २१ चेंडूंत २९ धावा केल्या. तिच्यानंतर कविशा दिलहारीने ११ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. श्री चरणी आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेत श्रीलंकेच्या फलंदाजीची कंबर मोडली.
भारताच्या गोलंदाजीत दीप्ती शर्मा, श्री चरणी आणि श्रेयंका पाटील यांनी अचूक लाईन आणि लेंग्थवर बॉलिंग करत श्रीलंकेच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. या तिन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी महत्त्वाच्या विकेट्स घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. भारतीय खेळाडूंच्या या ऑलराऊंडर कामगिरीच्या बळावर सामन्यावर पूर्णपणे भारताचे वर्चस्व राहिलं.



