Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनइंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ला अखेरीस मिळाले ‘बेहतरीन तेरह’

इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ला अखेरीस मिळाले ‘बेहतरीन तेरह’

मुंबई | Mumbai

डान्स रियालिटी शो इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 3 ची दमछाक करवणारी ऑडिशन फेरी आणि त्यानंतरची खडतर मेगा ऑडिशन पूर्ण होऊन आता या स्पर्धेत टिकून राहिलेले ‘बेहतरीन तेरह’ स्पर्धक आता प्रेक्षकांसमोर आले आहेत. सोनाली बेंद्रे, गीता कपूर आणि टेरेन्स लुईस या EENT स्पेशलिस्ट परीक्षकांनी सर्वोत्तम तेरा स्पर्धकांची निवड केली आहे…

- Advertisement -

हे आहेत सर्वोत्तम तेरा स्पर्धक

मध्य प्रदेशचा अक्षय पाल, पश्चिम बंगालचा नोरबू तमांग आणि सुश्मिता तमांग, उत्तर प्रदेशहून आलेली हंसवी टोंक, पश्चिम बंगालचा बूगी एलएलबी, महाराष्ट्राचा समर्पण लामा आणि शिवम वानखेडे, दिल्लीचा विपुल खांडपाल आणि अनिकेत चौहान, दिल्लीची अंजली मामगाई, मध्य प्रदेशचा शिवांशु सोनी, महाराष्ट्राची अपेक्षा लोंढे आणि पंजाबचा राम बिष्ट. पुढील वीकएंडपासून प्रेक्षक या युवा प्रतिभावंतांना त्यांच्या कोरिओग्राफर सोबत IBD च्या तिसऱ्या सत्राचा प्रवास धडाक्यात सुरू करताना बघतील!

मोठी बातमी! नक्षलवाद्यांचा जवानांच्या ताफ्यावर हल्ला; ११ शहीद

‘डान्सचा चार्ली चॅप्लिन’ हे बिरुद देऊन टेरेन्स लुईसने ज्याचा गौरव केला, त्या नवी दिल्लीच्या अनिकेत चौहानने तर ऑडिशन फेरीतच ‘ए हैरते आशिकी’ गण्यावरील आपल्या फ्रीस्टाइल परफॉर्मन्सने परीक्षकांना अशी काही भुरळ घातली की, त्याला थेट ‘बेहतरीन तेरह’ मध्ये स्थान मिळाले. अशी थेट झेप घेणारा तो IBD च्या इतिहासातील पहिला स्पर्धक ठरला.

महाराष्ट्राच्या शिवम वानखेडेने आपल्या खास व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांचे मन जिंकले. त्याचे हे व्यक्तिमत्व त्याच्या डान्समधून देखील झळकताना दिसले, जेव्हा त्याने बॉलीवूड स्टाइलमध्ये ‘के पग घुंघरू बांध’ गाण्यावर परफॉर्म केले. त्याचा तो परफॉर्मन्स इतका मनोरंजक होता की सोनाली बेंद्रेला तर शिट्टी मारायची इच्छा झाली.

उत्तर प्रदेशच्या हंसवीने ‘ओह हो हो हो’ गाण्यावर अप्रतिम कथ्थक डान्स केला, ज्यावर परीक्षक टेरेन्स लुईस आणि गीता कपूरने तिला स्टँडिंग ओव्हेशन दिले! दिल्लीच्या अंजली मामगाईने ‘कभी आर कभी पार’ गाण्यावर मोहक पण दमदार परफॉर्मन्स देत मंचावरील साचेबंदपणा मोडीत काढला. तिच्या परफॉर्मन्सचे सर्व परीक्षकांनी तोंड भरून कौतुक केले आणि टेरेन्स लुईसने ‘चुम्मेश्वरी परफॉर्मन्स’ म्हणून तिच्या परफॉर्मन्सचा गौरव केला.

महाराष्ट्राच्या समर्पण लामाला तर जॅकपॉट लागला आणि जिथल्या तिथे त्याची ‘बेहतरीन तेरह’ मध्ये निवड झाली. ‘क्या मुझे प्यार है’ गाण्यावरील त्याच्या कंटेम्पररी डान्सने थेट परीक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्याच्या फुटवर्कने थक्क होत, परीक्षक गीता कपूरने त्याच्या पायाला काला टीका लावला.

‘पिया रे पिया रे’ गाण्यावर परफॉर्म करून दिल्लीच्या विपुल खांडपालने सुंदर, भावुक वातावरण उभे केले. मंचाच्या वेगवेगळ्या बाजूंचा त्याने केलेला सुंदर उपयोग पाहून टेरेन्स लुईस प्रभावित झाला. मेगा ऑडिशन फेरीत ‘जुदाई’ गाण्यावर मध्य प्रदेशच्या शिवांशु सोनीने कथ्थक आणि फ्रीस्टाइलचे अफलातून फ्यूजन सादर केले आणि आपले नृत्य-कौशल्य दाखवले.

जलयुक्त शिवाराला मोठे यश; जलसंवर्धनात महाराष्ट्र देशात अव्वल

पंजाबचा पुत्तर राम बिष्ट याने कंटेम्पररी परफॉर्मन्स देऊन सर्वांना हेलावून टाकले. त्याचे डान्सबद्दलचे वेड त्याच्या परफॉर्मन्समधून व्यक्त झाले आणि कधीही हार न मानण्याची त्याची वृत्ती पाहून सर्व परीक्षकांचे डोळे पाणावले. सोनाली बेंद्रे म्हणाली की तिला त्याच्या डान्समधून त्याच्या भावना अनुभवता आल्या. आपल्या अद्भुत डान्सिंग कौशल्यानेच नाही, तर आपल्या सहृदयतेने अपेक्षा लोंढेने परीक्षकांना प्रभावित केले. महाराष्ट्रातील अपेक्षाने ‘तेरी मेरी प्रेम कहानी’ गाण्यावर हृदयस्पर्शी कंटेम्पररी परफॉर्मन्स देऊन सर्वांना थक्क करत, ‘बेहतरीन तेरह’ मध्ये स्थान मिळवले.

मध्य प्रदेशच्या अक्षय पालने ‘एक पल का जीना’ गाण्यावर दमदार परफॉर्मन्स देत आपले पॉपिंगचे कौशल्य दाखवले. त्याचा बॅटल पार्टनर पश्चिम बंगालचा बूगी एलएलबी यानेही तोडीस तोड पॉपिंग परफॉर्मन्स ‘दिल क्यों ये मेरा’ गाण्यावर दिला. त्यांचे बॅटल म्हणजे या एपिसोडचा सर्वोच्च बिंदू होता, जेव्हा त्या दोघांनी ‘प्यार किया तो निभाना’ गाण्यावर परफॉर्म करून मंच दणाणून सोडला. परीक्षक तो परफॉर्मन्स पाहताना थक्क होऊन गेले. त्यांचा अद्भुत परफॉर्मन्स पाहून सर्व उपस्थित कोरिओग्राफर्सनी आपापले शूज मंचावर ठेवून त्यांना मानवंदना दिली.

Video : काळ आला होता पण वेळ आली नव्हती! 30 फूटांवरुन चिमुकली कोसळली अन् पुढे घडलं असं काही…

इंडियाज बेस्ट डान्सर 3 मधले राहुल आणि अंजली म्हणजे पश्चिम बंगालचे नोरबू आणि सुश्मिता तमांग. त्यांची मैत्री तर लोभस आहेच, पण आपल्या सोलो अॅक्शन पॅक्ड परफॉर्मन्सने त्यांनी सर्वांना मोहित केले आणि दोघांनी ‘बेहतरीन तेरह’मध्ये स्थान पक्के केले. ‘गुस्ताख दिल तेरे लिए’ गाण्यावरील नोरबूच्या हिप हॉप डान्सने सर्व परीक्षकांना अवाक केले. टेरेन्स लुईसने नोरबूची तुलना फ्रेड अस्टेअरशी केली. सुश्मिताने ‘मनिके’ गाण्यावर अॅनिमेशन आणि पॉपिंगचे फ्यूजन सादर केले आणि मंच जिंकून घेतला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या