Saturday, June 15, 2024
Homeदेश विदेशकॅनडाला भारताची जशास तशी वागणूक! वरिष्ठ राजदूताला तात्काळ हटवलं, ५ दिवसांत देश...

कॅनडाला भारताची जशास तशी वागणूक! वरिष्ठ राजदूताला तात्काळ हटवलं, ५ दिवसांत देश सोडण्याचे आदेश.. नेमकं प्रकरण काय?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

लिस्तानमुद्यावरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव चांगलाच वाढला आहे. कॅनडाने भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिल्यावर भारताने देखील प्रत्युत्तर म्हणून कठोर कारवाई करत कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली आहे.

भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्तांना आज भारतानं समन्स पाठवलं आणि भारतातील कॅनडाच्या वरिष्ठ उच्चाधिकाऱ्याची भारतातून हाकालपट्टी केल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर हाकालपट्टी केलेल्या अधिकाऱ्याला पाच दिवसात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांना पाठिंबा असल्याबद्दल भारत सरकारनं चिंताही या प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त करण्यात आली आहे.

प्रकरण काय?

खलिस्तान टायगर फोर्सचा (KTF) प्रमुख हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताकडे रोख केला आहे. ट्रूडो यांनी सोमवारी या गोळीबारामागे भारतचा हात असल्याचा दावा केला आहे. सीबीसीच्या रिपोर्टनुसार, जस्टिन ट्रूडो म्हणाले की, कॅनडाची सुरक्षा एजन्सी भारत आणि खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा संबंध तपासत आहेत. पीएम ट्रूडो यांनी म्हटलं की, कॅनडाच्या सुरक्षा एजन्सी भारतीय सरकारी एजंट आणि कॅनेडियन नागरिक हरदीप सिंग निज्जर हत्येतील आरोपांचा पाठपुरावा करत आहेत. 18 जून रोजी कॅनडातील गुरुद्वाराबाहेर हरदीप सिंह निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. जी -20 शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत हा मुद्दा उपस्थित केला होता. कॅनडाने भारत सरकारच्या उच्च गुप्तचर सुरक्षा अधिकाऱ्यांकडे आपली चिंता व्यक्त केली, असं ट्रूडो यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी देखील जस्टिन ट्रूडो यांच्याकडे कॅनडातील अतिरेकी घटकांकडून केल्या जात असलेल्या भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या