मुंबई । Mumbai
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविरोधात गरळ ओकत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फिरत आहे. प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला फरार झाल्याची चर्चा असून याबाबत त्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. अशातच यावर इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी आपली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी हा विषय चिल्लर आहे असं न समजता गांभीर्याने घेण्याचा विषय म्हटलं आहे.
शिवद्रोही प्रशांत कोरटकर याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याने धमकी देऊन सुमारे दोन आठवडे उटलून गेले तरीही तो पोलिसांच्या हाताला लागत नाही. तो दुबईत गेल्याचे फोटो समोर येत आहेत, तसे वृत्तही आले आहे. असे जर असेल तर मंत्रालयातून त्याला मदत करणारे कुणीतरी आहे, असे म्हणावे लागेल. चिल्लर माणूस पोलिसांची दिशाभूल करून परदेशात पळाला, हे गृहखाख्याचे अपयश आहे, अशी टीका करीत शिवरायांचा अपमान करणाऱ्याला मंत्रालयातून कोण मदत करतो आहे, त्याचा बुरखा फाडलाच पाहिजे, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.
प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची माहिती प्रसारमाध्यमातून मिळत आहे. अशा प्रवृत्तीच्या माणसाला सुरुवातीलाच अटक व्हायला हवी होती. या प्रकरणाला असा एक महिना पूर्ण होत आला आहे. कायद्याचं संरक्षण नसताना आणि गुन्हे दाखल असताना देखील असा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी जाऊन पळून जातो तर हे गृह खात्याचा अपयश आहे. शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ मासाहेब यांचा जो अपमान करेल तो सुटता कामा नये, असे इंद्रजीत सावंत म्हणाले.