Friday, May 3, 2024
Homeनाशिकस्मार्ट सिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरणाचे निकृष्ट काम

स्मार्ट सिटी अंतर्गत गोदा सुशोभिकरणाचे निकृष्ट काम

नाशिक । Nashik

स्मार्टसिटी अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करुन सुशोभिकरणाचे काम सुरु असून ते निकृष्ट पध्दतिने केले जात असून छोट्या मोठ्या पूरात हे काम वाहून जाईल असा आक्षेप गोदाप्रेमींनी घेतला आहे.

- Advertisement -

याबाबत लक्ष्मण धोत्रे यांनी स्मार्ट सिटी कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहून या कामाबाबत आक्षेप नोंदवला आहे. तसेच हे पत्र त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवले आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरु आहेत. त्यापैकी दोनशे ते अडिचशे रुपये खर्च करुन गोदा घाट व तिचा आसपासचा परिसर सुशोभित करुन तिचे सौंदर्य वाढवले जाणार आहे. कागदावर जरी ही कामे चांगली वाटत असली तरी प्रत्यक्षात या कामांना गोदाप्रेमींनी अगोदरच विरोध दर्शवला आहे.

तरी देखील त्याची दखल न घेता स्मार्ट सिटिकडून सुशोभिकरणाचे काम हाती घेतली आहे. सध्या या प्रकल्पाअंतर्गत गोदाघाटाच्या दुतर्फा दगडी फरशा बसविण्याचे काम जोरात सुरु आहे. मात्र हे काम अतिशय निकृष्ट पध्दतिने सुरु असून सिमेंट काॅक्रिटच्यावरती रेती टाकून फरश्या बसवल्या जात आहे.

या अगोदर गोदावरीला सन २०१६ मध्ये आलेल्या महापुरात कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या गोदापार्क वाहून गेला. त्या तुलनेत स्मार्ट सिटीचे कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून एखाद्या छोट्या पूरात या फरश्या उखडल्या जाण्याची चिन्हे आहेत.

याबाबत गोदाप्रेमी लक्ष्मण धोत्रे यांनी स्मार्ट सिटीला पत्र लिहिले असून या कामातील निकृष्ट दर्जाकडे लक्ष वेधले असून हे काम थांबवावे अशी मागणी केली आहे.

फरशा बसविण्याचे काम निकृष्ट पध्दतिने केले जात आहे. जुन्या क्राॅकिटिकरणावर ५० मिमी रेतीचा थर व वरती ५० मिमी जाडीची फरशी बसवलि जात आहे.

या फरशीला खालुन कोणताही मजबूत आधार नसून छोट्या मोठ्या पूरात या फरश्या उखडल्या जाऊ शकतात.

– लक्ष्मण धोत्रे, गोदाप्रेमी

- Advertisment -

ताज्या बातम्या