Friday, November 15, 2024
Homeनगरआवक थांबली, गोदावरीतील विसर्ग बंद! जायकवाडीच्या दिशेने वाहिले 17.8 टिएमसी पाणी

आवक थांबली, गोदावरीतील विसर्ग बंद! जायकवाडीच्या दिशेने वाहिले 17.8 टिएमसी पाणी

राहाता (तालुका प्रतिनिधी)

पाऊस थांबला, धरणाचे विसर्गही थांबला! काल गोदावरीतील विसर्ग बंद करण्यात आला. कालपर्यंत 1 जूनपासून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यातून 17.8 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

- Advertisement -

गेल्या 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पाण्याची आवक कमी झाल्यामुळे धरणांतील विसर्ग कमी कमी होत गेले. काल दारणा, गंगापूर तसेच अन्य धरणांचे विसर्ग बंद झाले आहेत. दारणाचा विसर्ग काल सकाळी 9 वाजता बंद करण्यात आला आहे.

हे हि वाचा : Ladki Bahin Yojana : जिल्ह्यातील बँकांत ‘लाडक्या बहिणीं’ची एकच गर्दी

दारणातून एकूण आता पर्यंत 9.7 टिएमसी चा विसर्ग नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या दिशेने करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 1.3 टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर गंगापूर धरणाचा विसर्ग शुक्रवारी सकाळी 9 वाजता बंद करण्यात आला आहे.

त्यामुळे नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात नवीन पाण्याची आवक थांबल्याने काल सकाळी 10 वाजता 101 क्युसेकने गोदावरीतील सुरु असलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. गोदावरीत काल सकाळी 6 पर्यंत 2 लाख 6 हजार 390 क्युसेक इतका विसर्ग एकूण करण्यात आला आहे. म्हणजेच 17.3 टिएमसी पाण्याचा विसर्ग आतापर्यंत झाला आहे.

भावलीतून दारणाकडे 73 क्युसेक, भाम मधून 150 क्युसेक ने विसर्ग सुरु आहेत. वालदेवीतून 65 क्युसेकने विसर्ग सुरु आहेत. अन्य सर्व धरणांचे विसर्ग बंद झाले आहेत.

हे हि वाचा : रामगिरी महाराजांवर वैजापूर, नगर, संगमनेरात गुन्हे दाखल

जायकवाडीचा साठा 30.76 टक्के

काल शनिवारी सायंकाळी 6 वाजता जायकवाडीत 2189 क्युसेकने पाण्याची आवक सुरु होती. जायकवाडी जलाशयात 30.76 टक्के उपयुक्त पाणी साठा झाला आहे. म्हणजेच 23.5 टिएमसी उपयुक्तसाठा तर मृतसह एकूण साठा 49.66 टक्के इतका झाला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या