Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याNitin Desai Death : नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार

Nitin Desai Death : नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणार

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येप्रकरणी रशेष शाह आणि एआरसी एडेलवेस कंपनीची चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केली. तसेच देसाई यांनी उभारलेले एन.डी स्टुडिओ ताब्यात घेऊन संवर्धन करण्याच्या दृष्टीने सर्व कायदेशीर बाबी तपासून पाहाण्यात येतील, असे आश्वासनही फडणवीसांनी दिले.

- Advertisement -

निसर्गकवी हरपला! ज्येष्ठ साहित्यिक ना.धों. महानोर यांचं निधन

भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा (Suicide)मुद्दा मांडला. देसाई यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू एवढीच चौकशी न करता ही चौकशी अधिक व्यापक करण्याची मागणी त्यांनी केली. नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओवर १८० कोटींचे कर्ज काढले होते. या १८० कोटींचे २५२ कोटी झाले.

Nitin Desai Death : नितीन देसाईंचा शवविच्छेदन अहवाल आला समोर; ‘या’ कारणामुळे झाला मृत्यू

या प्रकरणातून रशेष शाह नामक व्यक्ती आणि ‘एआरसी एडेलव्हाईस’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसूलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी, असे शेलार म्हणाले. तसेच या कंपन्या आधुनिक सावकार असून त्यांची अन्य दोन प्रकरणाची माहिती आपल्याकडे असून तीही गृहमंत्र्यांकडे देणार असल्याचे शेलार सांगितले.

Ajit Pawar : …अन् राहुल नार्वेकरांमुळे अजित पवारांना मिळाली मुख्यमंत्रीपदाची खुर्ची

तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देसाई यांच्या कथित आर्थिक फसवणुकीची चौकशी सरकारने करावीच पण त्यांनी कर्जत जवळ उभा केलेला भव्यदिव्य स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली. यावर फडणवीस यांनी, देसाई यांनी आत्महत्या का केली याची चौकशी करताना त्यांची आर्थिकदृष्ट्या कोणी फसवणूक केली का, त्यातून त्यांना आत्महत्या करावी लागली का, याची चौकशी केली जाईल. स्टुडिओ ताब्यात घेण्यासंदर्भात कायदेशीर बाजू तपासून निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Monsoon Session : “मुख्यमंत्र्यांनी ठरवावं नंबर एकचा अन् दोनचा उपमुख्यमंत्री कोण?; जयंत पाटलांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

- Advertisment -

ताज्या बातम्या