Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : इंस्टाग्रामवर बदनामी व धमकी; पोलिसांत दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Crime News : इंस्टाग्रामवर बदनामी व धमकी; पोलिसांत दोघांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

धार्मिक कार्यक्रमात रांगोळी रेखाटल्यानंतर मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेला संग्राम आसाराम रासकर (रा. माळीवाडा) याची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

संग्रामचा भाऊ अनिकेत बाबासाहेब रासकर (वय 23 रा. बारातोटी कारंजा, माळीवाडा) यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिकेत रासकर यांचे चुलतभाऊ संग्राम रासकर यांचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटधारकांनी संपादित करून त्यावर स्टीकर लावले. तसेच इंग्रजीत अश्लिल व अशोभनीय मजकूर लिहून त्यांची बदनामी केली. याचबरोबर फिर्यादीच्या नातेवाईकाला जिवे मारण्याची धमकी दिली.

YouTube video player

या प्रकरणी अबूसलेमन इम्रान सय्यद याच्यासह आणखी एका इंस्टाग्राम अकाउंटधारक इसमांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात समीर राजु सय्यद (वय 23 रा. केडगाव वेशी जवळ, अहिल्यानगर) याच्यावर पोलिसांनी बीएनएस कलम 170 (1) प्रमाणे कारवाई केली आहे. दरम्यान शहरात दोन समाजाच्या गटांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...