नाशिक रोड |प्रतिनिधी| Nashik Road
रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या जेलरोड परिसरातील कॅनल रोड आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणार्या पाच जणांच्या टोळी विरुद्ध उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रिल्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांना पोलिसांनी चांगला दणका दिला आहे. याबाबतचे वृत्त असे की, नाशिक कि गुन्हेगारी जानालेवा है रे, सरळ घरत घुसून समान अडकवतो रे अशा प्रकारचे रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्या कॅनल रोड, आम्रपाली नगर, झोपडपट्टी येथील पाच युवकांविरोधात सोमवार दि. 13 रोजी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या शहरात सोशल मीडियावर रिल्स व्हायरल करणार्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस पथक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार उपनगर पोलिस ठाण्यातील कर्मचारी गौरव गवळी सोशल मिडिया मॉनिटरिंग करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये इंस्टाग्रामवर माहिती घेत असताना उपनगर, कॅनल रोडवर असलेल्या आम्रपाली नगर येथील संशयित युवक सोहेल सलीम पठाण याच्या इस्टाग्रामवर 2 व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. यामध्ये 4 ते 5 युवक व्हिडिओमध्ये नाशिक की गुन्हेगारी जान लेवा है रे, सरळ घरात घुसून समान अडकवतो रे, गुन्हेगारी की बात मत कर मेरे सामने, चांगल्या चांगल्याचा काढला मी घाम रे, गुन्हेगारी ओ तेरे धन्या रे, तेरे बाप को पूछ मेरा नाम रे असा धमकीचा आवाज समाविष्ट करीत सोहळा मीडियावर नाचताना दिसून येत आहे.
तसेच नाशिकची गुन्हेगारी किती धोकादायक आहे. त्याची समाजामध्ये किती दहशत आहे. हे दर्शवून समाजामध्ये भितीयुक्त वातावरण निर्माण करीत शांतता भंग केल्याचा प्रकार केला असल्याने पोलिसांनी सोहेल पठाण सह 4 ते 5 युवकांना ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत.
दरम्यान पोलिसांनी गुंडगिरी विरुद्ध सुरू केलेल्या या मोहिमेचे शहर व परिसरात नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या या मोहिमेबद्दल त्यांच्या समर्थनात नाशिक रोड परिसरात ठीक ठिकाणी बॅनर व फलक लावण्यात आले आहे.




