Friday, November 22, 2024
Homeक्राईमखोटी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीची फसवणूक

खोटी कागदपत्रे तयार करून विमा कंपनीची फसवणूक

इन्शुरन्स एजंटसह हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांविरूध्द गुन्हा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन रुग्णालयातील कर्मचार्‍यांना हाताशी धरून एकाच आजाराचे अ‍ॅडमिशन दाखवून खोटे कागदपत्रे तयार करून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल हेल्थ इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वकील संतोष औडाजी साठे (वय 43, रा. येरवडा, पुणे) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे सदर कंपनीमध्ये लिगल कन्सलटंट म्हणून काम पाहात आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून सुधीर पद्मनाथ झिने (रा. हिंगोणी- कांगोणी, ता. नेवासा), फेअर बँक जेम्स फेडशिप मेमोरियल हॉस्पिटल आणि कम्युनिटी हेल्थ युनिय हॉस्पिटल वडाळा (ता. नेवासा) व जीवन ज्योत हॉस्पिटल शेवगाव या दोन्ही हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅब, डाायग्नॉसिस सेंटरमधील कर्मचारी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीत म्हटले आहे की, सुधीर झिने हा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अधिकृत एजंट आहे. त्याने नगर जिल्ह्यातील फेअर बँक जेम्स फेडशिप मेमोरियल हॉस्पिटल आणि कम्युनिटी हेल्थ युनिय हॉस्पिटल वडाळा व जीवन ज्योत हॉस्पिटल शेवगाव या दोन्ही हॉस्पिटल, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नॉसिस सेंटरमधील कर्मचार्‍यांना हाताशी धरून 2 जुलै ते 10 जुलै 2023 या कालावधीत एकाच आजाराचे ऍडमिशन दाखवून खोटे कागदपत्र तयार केले. ते खरे असल्याचे भासवून खोटे व बनावट कागदपत्र करून स्वत:च्या फायद्यासाठी खोटे आरोग्य बील परतावा दावा तयार करून ते युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी, शाखा मार्केट यार्ड व ओरिएंटल हेल्थ इन्शुरन्स कंपनी शाखा अंबरप्लाझा, नगर या दोन्ही सरकारी इन्शुरन्स कंपनीमध्ये दाखल करून कंपनीचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगीता कोकाटे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या