Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसातपूरच्या ईएसआय रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाचे उद्या लोकार्पण

सातपूरच्या ईएसआय रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाचे उद्या लोकार्पण

कामगारांना उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही — आ. सीमा हिरे

- Advertisement -

सातपूर | प्रतिनिधी Satpur

YouTube video player

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने सातपूर येथील ईएसआय हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीसह १० सुसज्ज बेड असलेला अतिदक्षता कक्ष (आयसीयु) उभारण्यात आला आहे. या कक्षाचे लोकार्पण उद्या, शुक्रवारी(दि.१५) राज्याचे जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात येेणार आहे.

आमदार सीमा हिरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प साकारला आहे. रुग्णालयात आतापर्यंत आयसीयू सुविधा उपलब्ध नसल्याने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना गंभीर उपचारासाठी इतरत्र जावे लागत होते. आता ही गरज उरणार नाही, असे आ. हिरे यांनी सांगितले.

सातपूर औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे ३५ वर्षांपूर्वी ईएसआय रुग्णालयाची उभारणी करण्यात आली होती. मात्र आयसीयू सुविधा नसल्याने नाराजी व्यक्त होत होती. मागील महिन्यात आ. हिरे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमवेत बैठक घेऊन कामगारांच्या अडचणी मांडल्या. त्या बैठकीत १५ ऑगस्टपर्यंत आयसीयू सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर आमदार सीमाताई हिरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात खा. राजाभाऊ वाजे, ईएसआयसीचे आयुक्त रमेश चव्हाण, संचालक सोहम वायाळ व शशी कोळनुरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.एन.पावरा यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

संपादकीय : ६ जानेवारी २०२६ – नवा वाचनतोडगा

0
वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज नुकत्याच सातारा येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली. उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात केलेल्या घोषणेमुळे तिची आठवण पुन्हा...