Thursday, October 24, 2024
Homeक्राईमजास्त व्याजदर देण्याच्या आमिषाने तरुणाची 69 लाखांची फसवणूक

जास्त व्याजदर देण्याच्या आमिषाने तरुणाची 69 लाखांची फसवणूक

पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

लिओ हॉलीडेज या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखवून तरूणाची 69 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक येथे राहत असलेल्या तरुणाने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

दिलेल्या फिर्यादीवरून अजयकुमार बाळासाहेब जगताप, त्याचे वडिल बाळासाहेब गंगाधर जगताप, आई जयश्री बाळासाहेब जगताप (रा. भिस्तबाग, सावेडी, अहिल्यानगर), बहिण तेजश्री गणेश गायकवाड व गणेश बबन गायकवाड (रा. पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारची फसवणुक केल्याप्रकरणी अजयकुमार जगताप व इतरांविरूध्द यापूर्वी तोफखाना व कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यात आणखी एका गुन्ह्याची भर पडली आहे.

25 जुलै 2022 पासून ते 22 एप्रिल 2023 पर्यंत वेळोवेळी अजयकुमार जगताप व इतरांनी त्यांच्या लिओ हॉलिडेज या कंपनीमध्ये फिर्यादी यांनी पैसे गुंतवावे म्हणून त्यांना जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करून 36 लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यांचे व्याज 34 लाख 20 हजार रुपये असे एकूण 70 लाख 20 हजार रुपये देणार असे आमिष दाखविले. दरम्यान, जगताप व इतरांनी पैसे घेतल्यापासून फिर्यादी यांना फक्त 60 हजार रुपये परत केले. त्यांची मुद्दल व व्याजासह होणारी 69 लाख 60 हजार रुपये परत न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या