Monday, May 20, 2024
Homeब्लॉगआवड स्वत:ची निवड करिअरची

आवड स्वत:ची निवड करिअरची

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो. ‘पुढे तुम्ही काय करणार? काही ठरवले आहे का?’ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना माहितीच असतील असे नाही. त्यांना आवडणार्‍या गोष्टी आणि करिअरच्या वाटा यात काही संबंध असू शकतो, हेही अनेकांच्या गावी नसते. विद्यार्थ्यांशी पत्राद्वारे गप्पा मारणारे ‘आवड-निवड’ हे नवे सद

विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,

तुम्ही मागचा लेख वाचला आणि त्यात सांगितलेल्या खेळाची पहिली पायरी पूर्ण केली ना! तर मग आता खेळाची दुसरी पायरी जाणून घेऊन पुन्हा एका नवीन करिअरची ओळखही करून घेऊया! चला, तर मग तयार आहात! खेळ खेळायला. आणि हो, तुम्ही सर्वांनी वर्तुळाच्या बाजूने लिहिलेल्या तुमच्या आवडीची संख्या व कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे हे नक्की ठरवा.

- Advertisement -

चला आता आपण आपला खेळ पुढे खेळूया! मागच्या वेळेस तुम्ही पाच सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढले होते, आठवते ना! आता यावेळेस सहा सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचे आहे. वर्तुळात तुमचे स्वतःचे नाव लिहा आणि आवड (उदा. दर्शनची आवड/ दर्शनाची आवड). अशा पद्धतीने लिहायचे आहे. आता ‘तुमचे नाव व आवड’ असा शब्द लिहिलेल्या वर्तुळाचा कागद (पेपर) तुमच्या आईकडे द्या आणि आईला सांगा, आई, मला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडते ते या वर्तुळाच्या बाहेर लिहून देशील. आता मात्र तुम्ही मौन धारण करायचे आहे. तुम्हाला काय करायला आवडते, ते तुमच्या आईला ओळखता येते का? ते पाहूया! आहे ना गंमत! बघूया मुलांनो, तुमच्या आईला तुमच्या आवडीच्या किती गोष्टी माहीत आहेत? अगदी खाण्यापासून तर खेळ, मित्र-मैत्रिणींसोबत केलेल्या जसे ट्रेकिंग, किल्ला बनवणे, गणपती सजावट असे बरेच काही. अशा पद्धतीने आपल्या खेळाची दुसरी पायरी पूर्ण करायची आहे. आईला आठवडाभर आठवतील तसतशा तुमच्या सर्व आवडी वर्तुळाच्या बाहेर लिहायला सांगायचे. यापुढचा खेळ आपण पुढच्या भागात खेळूया, तोपर्यंत तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्याची आवड कळवल्यावर त्याच्याशी पत्राद्वारे केलेल्या गप्पा वाचा.

इयत्ता दहावीत शिकणार्‍या मेहुलला सीए व्हायचे होते. इयत्ता दहावीतच करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याविषयीचा मेहुलचा विचार पक्का झाला होता. अनेक विद्यार्थ्यांना करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याविषयी संभ्रम असतो; परंतु मेहुलने आधीच करिअरविषयी विचार केलेला होता. मेहुलला मी पत्राद्वारे जे मार्गदर्शन केले होते तेच तुम्हालाही सांगण्याचा प्रयत्न. कदाचित तुम्हाला पण तुमच्या करिअरसाठी फायदा झाला तर मला नक्कीच आनंद होईल. मेहुलला लिहिलेले पत्र असे होते.

चि. मेहुल यास,

शुभाशीर्वाद.

मेहुल, तुला चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) व्हायचे आहे. हे वाचून खूप आनंद झाला. जेथे जेथे खरेदी-विक्री हा व्यवहार येतो तेथे तेथे सीएची गरज भासत असते. इयत्ता दहावीपासूनच सीए होण्याची तयारी चालू ठेवल्यास यश गाठणे सहज शक्य होते. वेगवेगळे कर व त्याविषयीची माहिती जमा करून त्याची डायरीत किंवा वहीत नोंद करून ठेवत जा. वृत्तपत्रात काही करविषयक खटल्यांविषयी बातमी आल्यास त्याचीही नोंद करून ठेवण्याची सवय लावून घे. गणितातल्या काही संकल्पना नीट समजून घेणे आवश्यक आहे. नफा-तोटा, व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज अर्थात याबरोबरच गणित विषयातील इतर घटकांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. इंग्रजी बोलण्याचा सराव नियमितपणे करावा. कारण परकीय कंपन्या, बीपीओ, केपीओ यांच्यासाठी सल्लागार म्हणून काम करताना भाषेची अडचण येऊ नये. तसेच स्थानिक पातळीवर खासगी बँका व मोठ्या व्यावसायिकांच्या अकाऊंटचा तपशील सांभाळण्याकरता क्लायंटशी संवाद साधण्याकरता मराठी भाषेवरही प्रभुत्व असणे आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत कॉम्प्युटरचा क्लास करण्याचा प्रयत्न करशील, जेणेकरून त्यात अकाऊंटचा समावेश असेल. तुझ्या नात्यात, ओळखीत किंवा शेजारी कुणी सीए असेल तर त्यांची छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न कर. मुलाखतीत तुला असणार्‍या शंकांविषयी विचारून शंकांचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न करावा. आज परकीय कंपन्या, फायनान्स कंपन्या, खासगी बँका, नवनवीन उद्योजक या सर्वांना सीएची गरज भासत आहे, त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. तुझ्या शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

तुझी, ताई

- Advertisment -

ताज्या बातम्या