Wednesday, May 22, 2024
HomeUncategorizedInternational Dog Day : रात्री कुत्रे का रडतात?, काय आहे वैज्ञानिक कारणे?

International Dog Day : रात्री कुत्रे का रडतात?, काय आहे वैज्ञानिक कारणे?

आज आंतरराष्ट्रीय श्वान दिवस (International Dog Day). दरवर्षी २६ ऑगस्ट रोजी सर्व जातीची कुत्री पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय श्वान दिवस (dogs day 2021) साजरा केला जातो. कुत्रा (dog day) हा प्राणी जगभरात प्रत्येक ठिकाणी आढळतो. अनेक लोकांना कुत्रे पाळण्याची आवड असते. कुत्रा हा अतिशय प्रामाणिक प्राणी असतो आणि वेळप्रसंगी आपल्या मालकासाठी तो प्राणही देतो. आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत रात्री कुत्रे का रडतात. (Why do dogs cry at night?)

आपणही अधिकांश वेळा रात्री कुत्रे रडण्याचा (dogs cry at night) आवाज ऐकला असणार. काही लोकं या गोष्टीला सामान्य मानून कुत्र्याला त्या ठिकाणून पळवून लावतात मात्र, काही लोकं याबाबत अंधश्रद्धा बाळगतात. याप्रकारच्या लोकांमध्ये असा विश्वास असतो की, रात्री कुत्रे रडणे म्हणजे काहीतरी अशुभ संकेत. (world dog day)

- Advertisement -

विशेषतः गावांमध्ये प्रचलित गोष्टींनुसार, रात्री कुत्रे यामुळे रडतात कारण त्यावेळी त्यांना आजूबाजूच्या आत्मा दिसत असतात. सोबतच, इतर लोकांचा असा विश्वास आहे की ज्या कोणाच्या अंगणात कुत्रे रडतात त्यांच्या परिवारासाठी भविष्य काही चांगलं नव्हे अर्थातच पुढे नैसर्गिक आपत्तीमुळे परिवारातील कुणाचा मृत्यू देखील होऊ शकतो. (today special day)

मात्र हा झाला एक अंधश्रद्धेचा भाग, ‘रात्री कुत्रे रडतात’ यामागे काही वैज्ञानिक कारणे (scientific reasons) आहे. सांगितलं जातं की रात्रीच्या वेळी कुत्रे त्यांच्या साथीदारास काही संदेश पोहोचविण्याकरिता हाऊल करतात. सोबतच या विशेष आवाजाद्वारे, ते सहसा आपल्या साथीदाराला त्यांचे स्थान (Location) सांगतात जेणेकरून ते सहज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. (happy international dog day)

तसेच कुत्र्यांना वेदना होत असल्यास व भूक लागल्यास ते रडतात किंवा किंचाळतात. कितीही केलं तरी त्यांच्यात जीव तर आहेच आणि वेदना होत असल्यास ते याप्रकारे व्यक्त करतात.

सामान्यतः कुत्र्यांचे खास साथीदार मनुष्य असतात आणि रात्री एकटेपणा जाणवल्यास ते अश्याप्रकारे रडतात. विशेष करून घरातील पाळीव कुत्रे घरी कोणी नसल्यास ते रडतात हे ही कुत्र्यांच्या रडण्यामागील (dogs cry) एक प्रमुख कारण आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या