Friday, December 13, 2024
Homeमुख्य बातम्या‘आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र' उपक्रम

‘आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र’ उपक्रम

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

चंद्राविषयी मानवाला नेहमीच कुतूहल आणि जिज्ञासा वाटत आलेली आहे.

- Advertisement -

चंद्राच्या दुरून दिसणा-या सौंदर्यावर अनेक कथा आणि कविता मानवी मनाला भूरळ घालत आलेल्या आहेत. तरूणार्ई तर चंद्राला वैयक्तिक मालमत्ता समजत आपला हक्क गाजवत आहेत. भारतीय कालगणना आणि सणांची सांगड प्रामुख्याने चंद्राच्या कलांशीच जोडलेली आहे.

चतुर्थी, अमावस्या, पौर्णिमा हे दिवस तर चंद्राच्या दिसण्यावरच अवलंबून आहेत. एवढच काय अमावस्येला अशुभ ठरवण्यासाठी चंद्राचाच दुरूपयोग करण्यात आलेला आहे. अशा या लुभावणा-या चंद्राचे निरीक्षण करणे, चंद्राविषयी वास्तव माहिती जाणून घेणे आणि अंतराळ संशोधनाबद्दल जागृती निर्माण करण्याच्या हेतूने ‘आंतरराष्ट्रीय चंद्र निरिक्षण रात्र` या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

‘आंतरराट्रीय स्तरावर रात्र साजरी होणारा’ हा बहुतेक एकमेव कार्यक्रम असावा. सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यातील अमावस्येनंतर बरोबर अर्ध्या रूपात दिसणा-या चंद्राच्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय चंद्र निरीक्षण रात्र` म्हणून अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा` दि. १८ सप्टेंबर २०१० पासून या उपक्रमाचे आयोजन करत आलेली आहे. या दिवशी चंद्र सूर्याला बरोबर नव्वद अंशात येतो. भारतीयांच्या दृष्टीने हा दिवस अष्टमीच्या दरम्यान येतो. या वर्षी दि. २६ सप्टेंबर रोजी ही रात्र साजरी केली जाणार आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘आंतरराष्ट्रीय चंद्र निरिक्षण रात्र` हा उपक्रम शाखा अथवा वैयक्तिक पातळीवर साजरी करण्याचे नियोजन आहे. कालगणने बरोबरच सणांचे मुख्य उद्देश आणि आज निर्माण झालेले आर्थिक हितसंबंध समजून घेत कर्मकांडातून समाजाला मुक्त करण्याच्या उद्देशाने महा.अंनिस सदर उपक्रमाचे आयोजन करत आहे.

चंद्राचे निरीक्षण करणे, चंद्राविषयी कथा, कविता,घोषवाक्ये लिहीणे, चंद्राच्या कलांचे चित्र अथवा फोटो काढणे, ऑनलाइन चर्चासत्र अथवा व्याख्यान, आकाश निरीक्षण आदी उपक्रमाचे संयोजन करणे अपेक्षित आहे. कोरोना आपत्तीच्या सर्व अटी विचारात घेऊन कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करावे.

सदर उपक्रमाचा संक्षिप्त अहवाल, नाव, गाव आणि दोन फोटो सहित दि. २७ सप्टेंबर रोजी अवधुत कांबळे (9921359099) यांचेकडे व्हाटस्‌ अप व्दारे पाठवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने नेहमीच खगोल विज्ञानाबद्दल जनजागृती केली जाते. निसर्गातील घडणाऱ्या विविध खगोलीय अविष्का बद्दल समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, उल्कावर्षाव यासंदर्भात नेहमीच उपक्रम व कृती कार्यक्रम केलेले आहेत. समितीच्या विज्ञानबोध वाहिनी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्यात खगोल विज्ञानाचे आवड तयार व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. थ्रीडी फिरते नभांगण हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचे काम महा अंनिस ने केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या