Thursday, May 15, 2025
Homeधुळेव्यापारी लुटप्रकरणात 5 संशयितांची चौकशी

व्यापारी लुटप्रकरणात 5 संशयितांची चौकशी

धुळे । Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरातील माधव कॉलनीतील (Madhav Colony) व्यापारी लुटप्रकरणाचा (Merchant robbery case) पोलिसांकडून (police) कसुन तपास सुरू (Investigation begins) करण्यात आला आहे. त्यात आज चार ते पाच संशयितांची चौकशी (Interrogation of suspects) करण्यात आल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.

अटल करंडक एकांकिका स्पर्धेत मूळजी जेठा महाविद्यालय विजयी

माधव कॉलनीत राहणारे परेश पटेल हे व्यापारी शनिवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीने ऐंशी फुटी रस्त्याने घराकडे जात होते. तेव्हा दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडविले. डोळ्यात मिरची पुड फेकत त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील 25 लाखांची रोकड लुटून नेली.

Photo # गाढेगाव येथील ओढयावर पक्षी निरीक्षण कार्यक्रमात ४५ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हचा तपास सपोनि संदीप पाटील हे करीत आहेत. दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चौघे लुटारू कैद झाले आहे. परंतू त्यांचे तोंड झाकलेले असून ते अस्पष्ट दिसत आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील हे करीत आहेत. त्यांनी स्वतः दोन संशयितांची आज चौकशी केली. तर उर्वरीत संशयितांचीही चौकशी करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकच्या सीपेट प्रकल्पासाठी विनामोबदला जमीन- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai नाशिक जिल्ह्यातील मौजे गोवर्धन येथे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (सीआयपीईटी) प्रकल्पासाठी जागा विनामोबदला देण्यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...