Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik News : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ८५ गुन्हेगारांची तपासणी

Nashik News : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील ८५ गुन्हेगारांची तपासणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) परिमंडळ दोनच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत एक हद्दपार मिळून आला असून प्राणघातक गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपीही (Accused) हाती लागला आहे. तर रेकॉर्डवरील ८५ गुन्हेगार तपासण्यात आले असून त्यापैकी मिळून आलेल्या ४८ गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरण्यात आले आहेत…

- Advertisement -

Ajit Pawar : भाजप पाठिंब्यावर अजित पवार मुख्यमंत्री?

तसेच ५३ तडीपार गुन्हेगारांपैकी २५ तडीपार गुन्हेगारांना (Criminals) तपासले असता अंबड हद्दीतील तडीपार गुन्हेगार गणेश विष्णु कुर्‍हाडे हा मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे. तर इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) दाखल भादंवि कलम ३२६ या गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी दिपक चंद्रकांत बारसे (वय ४६, रा. फ्लॅट नं. ०७, सोनल अपार्टमेंट, चेतनानगर, इंदिरानगर) याला अटक करण्यांत आली आहे.

काँग्रेसला नाशकात ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा; शहराला कायम अध्यक्ष नसल्याने नाराजी

तर इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar and Upnagar Police Station) हद्दीत ७४ वाहने तपासून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन (Violation of Motor Vehicle Act) करणार्‍या १९ इसमांविरुध्द कारवाई करून ९ हजार ५०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. याशिवाय उपनगर व इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८९ टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे.

Deshdoot Special : ड्रग्ज प्रकरण पोलीस आयुक्तांना भोवणार? बदलीची चर्चा; राजकारण जोरात, ठाकरे गटाचा मोर्चा

दरम्यान, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त (झोन दोन) मोनिका राऊत, सहायक आयुक्त आनंदा वाघ ( नाशिकरोड विभाग), शेखर देशमुख (अंबड विभाग ) यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बींग ऑपरेशन (Combing Operation) राबवण्यात आले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Crime News : घोटी टोलनाक्यावर ‘इतक्या’ लाखांचा गुटखा जप्त; नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

- Advertisment -

ताज्या बातम्या