Monday, November 25, 2024
Homeनाशिकपंचवटीतील 'त्या' खून प्रकरणाचा पाच तासांत उलगडा

पंचवटीतील ‘त्या’ खून प्रकरणाचा पाच तासांत उलगडा

नाशिक/पंचवटी प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे झालेल्या तरुणाच्या खून प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने अवघ्या पाच तासांत उलगडा करत एका महिलेने सुपारी देऊन चार संशयितांसह व दोन अल्पवयीनांच्या मदतीने खून केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक केली.

सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे (25) याची हत्या झाल्याची माहिती आज (दि.21) सकाळी पोलिसांना मिळाली. पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोधपथक व गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकान संयुक्तिक तपास सुरु केला. वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खून प्रकरणातील संशयित अशोकनगर, सातपूर, नाशिक भागातील असल्याचे समजले. या माहितीवरून पोलीसपथकाने त्या भागातून संशयित संकेत शशिकांत रणदिवे, अशोकनगर, सातपूर, मेहफूज रशिद सैयद रितेश दिलीप सपकाळेगीतम सुनिल दुसाने यांच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना सापळा रचून अटक केली.

पोलिसांनी त्यांच्याकडे गगनच्या खुनाबाबत चौकशी केली असता त्यांना भावना सुशांत कदम (रा. वृंदावननगर, म्हसरूळ ,नाशिक ) या महिलेने गगनला ठार मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी भावना हिला ताब्यात घेतले.

अशी झाली हत्या
संशयित भावना सुशांत कदम एका रात्रशाळेत शिक्षिका म्हणून काम करते. मयत गगनसोबत तिचे 2020 मध्ये प्रेमसंबंध जुळले होते. नंतर गगन तिला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे भावनाने गगनशी संबंध तोडले होते. तरीही गगनने तिला त्रास देणे सुरूच ठेवले होते. दरम्यान भावना दाद देत नसल्याने गगनने भावनाच्या मुलीलादेखील त्रास देणे सुरु केले. या प्रकारामुळे भावना प्रचंड मानसिक तणावात होती.

तिने तिच्या ओळखीच्या संकेत शशिकांत रणदिवे याला गगनचा काटा काढण्यासाठी 2 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील एक लाख रुपये अगोदर दिले. दि.20 ऑगस्टच्या रात्री साडेनऊच्या सुमारास भावनाने गगनला दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसतिगृहामागे भेटायला बोलावले. त्याची माहिती संकेत व त्याच्या साथीदारांना दिली. भावना व गगन बोलत असताना चार संशयितांसह 2 अल्पवयीन घटनास्थळी आले त्यांनी गगनला ‘तुम्हीं इथे काय करता?’ अशी विचारपूस करीत त्याला रॉडने मारहाण केली.

गगन खाली पडल्यावर सर्व संशयितांनी त्याला लाथाबुक्क्यांनी व रॉडने मारहाण सुरूच ठेवली. यात गगनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकर्‍यांनी घटनास्थळावरून पलायन केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या