Saturday, July 27, 2024
Homeनाशिकखरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

खरीप हंगाम पीक स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

नाशिक । प्रतिनिधी

कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत ‘खरीप पीक स्पर्धा -2023’ चे आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्यात पिकाची उत्पाकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांकडून विविध भागात विविध प्रयोग करण्यात येतात.अशा प्रयोगशील शेतकर्‍यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची ईच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होणे, नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी उत्पादनांमध्ये वाढ होऊन इतर शेतकर्‍यांना त्यांचे मागदर्शन मिळावे, या दृष्टीकोनातून पीक स्पर्धांचे आयोजन केले जाते. नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांमध्ये खरिप हंगामामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा अंतर्भाव पीक स्पर्धा योजनेत केला आहे.

स्पर्धत सहभागासाठी मूग व उडीद या पीकांसाठी अंतिम दि. 31 जुलै 2023 असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अंतिम दि. 31 ऑगस्ट 2023 आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकर्‍यांना स्वत:च्या नावावर असलेला 7/12, व 8अ आवश्यक असून आदिवासी शेतकरी बांधवांसाठी जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. पीकनिहाय चलन फी 300 रुपये इतकी आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांना बक्षीस

तालुका पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 5 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 3 हजार, व तृतीय क्रमांकास रूपये 2 हजार असे बक्षिसाचे स्वरूप आहे. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 10 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 7 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 5 हजार असे स्वरूप आहे. राज्य पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला प्रथम क्रमांकास रूपये 50 हजार, व्दितीय क्रमांकास रूपये 40 हजार व तृतीय क्रमांकास रूपये 30 हजार असे स्वरूप आहे. पीक स्पर्धा योजनेत सहभागी होण्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या