लुसाने –
आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती (आयओसी) ने पुढील वर्षी होणार्या टोकियो ऑलम्पिकसाठी नवीन प्रवेश पात्रता प्रक्रियेची घोषणा केली आहे.
आयओसीने म्हटले की २९ जून २०२१ ऑलम्पिक प्रवेशपात्रतेची शेवटीची तारीख असेल आणि अंतिम प्रवेशाची तारीख ५ जुलै २०२१ असेल. टोकियो ऑलम्पिकचे आयोजन या वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान होणार होते परंतु कोरोना विषाणूच्या कारणामुळे याला एक वर्षासासठी पुढे ढकले आहे. ऑलम्पिक क्रीडाना पुढे ढकलण्याची घोषणा झाली त्यावेळे पर्यंत एकूण ५७ टक्के खेळातील प्रवेश पात्रता पूर्ण झाल्या होत्या.
उर्वरीत राहिलेल्या जागांसाठी प्रवेशपात्रता प्रक्रियेला मान्यता देत याला अपडेट केले गेले आहे याला प्रवेशपात्रता टास्क फोर्सने मंजूरी दिली आहे आणि याची माहिती सर्व आंतरराष्ट्रीय महामसंघाना देण्यात आली आहे.
ऍथलेटिक्स, सायकिलिंग, भारत्तोलन, बास्केटबॉल, जूडो, रोइंग जलतरण, बॅडमिंटन, स्कॅटबोर्डिंग, तायक्वांदो आणि कुस्तीच्या प्रवेशपात्रता प्रक्रियेमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. तर तिरंदाजी, आर्टिस्टीक जलतरण, बेसबॉल, बास्केटबॉल, तीन गुणा तीन रनिंग, मुक्केबाजी, डाइविंग, फेसिंग, निशानेबाजी, स्पोर्ट क्लाइंम्बिंग, सफींग, टेबल टेनिस, ट्राइथालोन आणि वॉटर पोलोने प्रवेश पात्रता प्रक्रियेला वाढविले आहे आणि हे सुरुवातीला प्रसिध्द केलेल्या प्रवेशपात्रता प्रक्रियेसह काम करणे सुरु ठेवेल.
टोकियो ऑलम्पिकचे आयोजन आता पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान आयोजीत केले जाणार आहे.