Sunday, May 5, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : KKR vs RCB - कोलकात्याचा बंगळुरूवर विजय

IPL-2023 : KKR vs RCB – कोलकात्याचा बंगळुरूवर विजय

कोलकाता | वृत्तसंस्था

कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅॅलेंजर्स बंगळुरू यांच्या IPL-2023 चा क्रिकेटचा सामना आज खेळण्यात आला.यात कोलकाताच्या संघाने बाजी मारली. आजच्या सामन्यात शार्दुल ठाकूर ची आक्रमक फलंदाजी तर वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांच्या वैशिष्ट्येपूर्ण गोलंदाजीने कोलकात्याच्या संघाने बंगळुरूवर विजय मिळविला.

- Advertisement -

बंगळुरूच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून व्यंकटेश अय्यर व आर. गुरबाझ सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या चौथ्या षटकात डेविड विलीने व्यंकटेश अय्यरला क्लीन बोल्ड केले. व्यंकटेशने ७ चेंडूत ३ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर नंतर मैदानात आलेला फलंदाज मनदीप सिंघलाही डेविड विलीनेने क्लीन बोल्ड करत शून्य धावावर तंबूत परत पाठविले. सामन्याच्या सातव्या षटकात कर्णधार नितीश राणाला दिनेश कार्तिकने झेल बाद केले. नितीश राने ५ चेंडूत १ धाव केली.

सामन्याच्या १२व्या षटकात आकाश दीपने आर. गुरबाझला झेल बाद केले. आर. गुरबाझने ४४ चेंडूत ३ षटकार व ६ चौकार लगावत अर्धशतक करत एकूण ५७ धावा केल्या. कर्ण शर्माच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने आंद्रे रसेलला झेल बाद करत शून्य धावसंख्येवर माघारी पाठविले. रिंकू सिंघने ३३ चेंडूत ४६ धावा केल्या

शार्दुल ठाकूरने आक्रमक फलंदाजी केली. शार्दुल ठाकूरने २९ चेंडूत ३ षटकार व ९ चौकार लगावत ६८ धावा केल्या.ग्लेन मॅॅक्स्वेलने शार्दुलला झेल बाद केले. २० षटका अखेरीस कोलकात्याच्या संघाने ७ गडी बाद २०४ धावा केल्या.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

कोलकाताच्या संघाने दिलेल्या २०५ धावांचे आव्हान बंगळुरूच्या संघाला पार करता आले नाही. बंगळुरूच्या संघाकडून कर्णधार फाफ डूप्लेसी व विराट कोहली प्रथम फलंदाजीसाठी आले. सामन्याच्या ५ व्या षटकात सुनील नारायनने विराट कोहलीला क्लीन बोल्ड करत बंगळुरूच्या संघाला पहिला धक्का दिला.विराटने १८ चेंडूत २१ धावा केल्या.पाठोपाठ सहाव्या षटकात वरूण चक्रवर्तीने डूप्लेसीला क्लीन बोल्ड करत बंगळुरूच्या संघाला दुसरा धक्का दिला. डूप्लेसीने १२ चेंडूत २३ धावा केल्या. वरूण चक्रवर्तीने ग्लॅॅन मॅॅक्स्वेलला ५ धावांवर बाद करत तंबूत परत पाठविले.

सामन्याच्या आठव्या षटकात हर्षल पटेल वरूण चक्रवर्ती करवी शून्यावर बाद होत माघारी परतला.त्या पाठोपाठ शाहबाज अहमदही अवघ्या एक धावसंख्येवर शार्दुल ठाकूर कडून झेल बाद झाला.१२व्या षटकात नितीश राणाने मायकल ब्रेसवेलला झेल बाद केले. मायकल ब्रेसवेलने १८ चेंडूत १९ धावा केल्या. दिनेश कार्तिक ९ धावा तर अनुज रावतने १ धाव करून बाद होत तंबूत परतले. पंधराव्या षटकात नितीश राणाने कर्ण शर्माला झेल बाद केले. नितीशने ३ चेंडूत १ धाव केली. बंगळुरूच्या संघाने सर्व गडी बाद १२३ धावा केल्या. कोलकात्याच्या संघाने बंगळुरूवर ८१ धावांनी विजय मिळविला.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या