Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : MI vs CSK - चेन्नईचा मुंबईवर विजय

IPL-2023 : MI vs CSK – चेन्नईचा मुंबईवर विजय

मुंबई | वृत्तसंस्था Mumbai

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आज IPL-2023 चा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. यात चेन्नईच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या संघाकडून कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन सलामीला फलंदाजीस आले.रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत असतानाच सामन्याच्या चौथ्या षटकात तुषार देशपांडेने रोहित शर्माला त्रिफळाचीत केले. रोहितने १३ चेंडूत २१ धावा केल्या. आठव्या षटकात रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर इवेन प्रिटोरियसने ईशान किशनला झेल बाद करत मुंबईच्या संघास दुसरा धक्का दिला. ईशान किशनने २१ चेंडूत ३२ धावा केल्या.

८व्या षटकात मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीने सुर्यकुमार यादवला अवघ्या एक धावावर बाद करत माघारी पाठविले. ९व्या षटकात रविंद्र जाडेजाने कॅॅमेराॅॅन ग्रीनला झेल बाद केले.कॅॅमेराॅॅनने ११ चेंडूत १२ धावा केल्या. मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान पायचीत होत दोन धावा करत तंबूत परतला. १३ व्या षटकात रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा पायचीत झाला.तिलक वर्माने १८ चेंडूत २२ धावा केल्या.ट्रीस्टन स्टब ५ धावा करत झेल बाद झाला. २० व्या षटकाअंती मुंबईच्या संघाने ८ गडी बाद १५७ धावा केल्या.

चेन्नईच्या संघाकडून डेव्हन काॅॅन्वे व ऋतुराज गायकवाड प्रथम फलंदाजीस आले. सामन्याच्या चौथ्या चेंडूतच जेसन बीने डेव्हन काॅॅन्वेला क्लीन बोल्ड केले.अजिंक्य राहणेने आक्रमक फलंदाजी करत २७ चेंडूत ६१ धावा केल्या. पियुष चावलाच्या गोलंदाजीवर सुर्यकुमार यादवने अजिंक्यला झेल बाद केले. सामन्याच्या १५ व्या षटकात कुमार कार्तिकेयने शिवम दुबेला त्रिफळाचीत केले. शिवम दुबेने २६ चेंडूत २८ धावा केल्या. अंबाती रायडूने १६ चेंडूत नाबाद २० धावा केल्या तर ऋतूराज गायकवाडने ३६ चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. चेन्नईच्या संघाने मुंबईच्या संघावर ७ गडी राखून व ११ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या