Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाIPL-2023 : SRH vs RR : हैदराबादचा राजस्थानवर विजय

IPL-2023 : SRH vs RR : हैदराबादचा राजस्थानवर विजय

जयपूर | वृत्तसंस्था

जयपूर येथील सवाई मानसिंह मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्या आज IPL-2023 चा क्रिकेटचा सामना खेळण्यात आला. यात हैदराबादच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वाल व जोस बटलर सलामीला फलंदाजीस आले. यशस्वी जयस्वालने आक्रमक फलंदाजीने सुरुवात केली.सामन्याच्या ५व्या षटकात मार्को यान्सीनच्या गोलंदाजीवर टी नटराजनने यशस्वी जयस्वालला झेल बाद करत राजस्थानच्या संघास पहिला धक्का दिला. यशस्वी जयस्वालने १८ चेंडूत २ षटकार व ५ चौकार लगावत एकूण ३५ धावा केल्या. यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅॅमसन व जोस बटलरने आक्रमक फलंदाजी केली.अकराव्या षटका अखेरीस १ गडी बाद १११ धावा अशी स्थिती राजस्थानच्या संघाची होती.

१९व्या षटकात भुवनेश्वरकुमारच्या गोलंदाजीवर जोस बटलर पायचीत झाला.जोस बटलरने ५९ चेंडूत ४ षटकार व १० चौकार लगावत एकूण ९५ धावा केल्या.तर कर्णधार संजू सॅॅमसनने ३८ चेंडूत ५ षटकार व ४ चौकार लगावत नाबाद ६६ धावा केल्या. शिमराॅन हेटमायरने ५ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या.

२०व्या षटका अखेरीस राजस्थानच्या संघाने २ गडी बाद २१४ धावा केल्या.

हैदराबादच्या संघाकडून अभिषेक शर्मा व अमोलप्रीत सिंग प्रथम फलंदाजीस आले. हैदराबादच्या संघाकडून फलंदाजीची सुरुवात फारशी चांगली झाली नाही . सामन्याच्या ६व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर शिमराॅन हेटमायरने अमोलप्रीत सिंगला झेल बाद केले.अमोलप्रीत सिंगने २५ चेंडूत ३३ धावा केल्या. ९व्या षटकाअखेर १ गडी बाद ७३ धावा अशी स्थिती हैदराबादच्या संघाची होती.

अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करत अर्ध शतक पूर्ण केले . 13 व्या षटकात रविंद्रचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर युझवेंद्र चहलने अभिषेक शर्माला झेल बाद केले.अभिषेक शर्माने ३४ चेंडूत २ षटकार व ५ चौकार लगावत ५५ धावा केल्या. १६ व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर जोस बटलरने हेनरिक क्लासेनला झेल बाद केले. हेनरिक क्लासेनने १२ चेंडूत २६ धावा केल्या.

१८ व्या षटकात युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालने राहुल त्रिपाठीला झेल बाद केले. राहुल त्रिपाठीने २९ चेंडूत ३ षटकार व २ चौकार लगावत एकूण ४७ धावा केल्या. राहुल त्रिपाठी पाठोपाठ एडन मार्करम ६ धावा करत युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर पायचीत होत माघारी परतला.

७ चेंडूत ३ षटकार व १ चौकार लगावत ग्लेन फिलिप्स आक्रमक खेळी करत हैदराबादच्या संघाची धाव संख्या वाढविण्याचा प्रयत्नात असतानाच . शिमराॅॅन हेटमायरने ग्लेन फिलिप्सला झेल बाद केले.

अखेरच्या १ चेंडूत ५ धावा हैदरबादच्या संघास विजयासाठी लक्ष देणाऱ्या होत्या. अखेरचा चेंडू बाद धरून १ चेंडूत ४ धावा हैदराबादच्या संघास विजयासाठी आवश्यक झाल्या होत्या. शेवटच्या चेंडूत अब्दुल समदने षटकार लगावत हैदराबादच्या संघास विजय मिळवून दिला. हैदराबादच्या संघाने राजस्थानवर ४ गडी राखून विजय मिळविला.

- Advertisment -

ताज्या बातम्या