Friday, December 13, 2024
Homeक्रीडाकोलकाता नाईट रायडर्स 'आयपीएल-२०२४'चा विजेता

कोलकाता नाईट रायडर्स ‘आयपीएल-२०२४’चा विजेता

चेन्नई । वृत्तसंस्था chennai

चेन्नईतील एम ए चिदंबरम मैदानावर ‘आयपीएल-२०२४’चा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात खेळण्यात आला. यात कोलकाता नाईट रायडर्स च्या संघाने विजय मिळवून आयपीएल-२०२४चे विजेते पद मिळविले आहे.

- Advertisement -

एकोनावीसाव्या षटकात हैदराबादच्या संघाने सर्व गडी बाद ११३ धावा केल्या. तर व्यंकटेश अय्यर ने २६ चेंडूत ५२ धावा करत कोलकाताच्या संघाला विजय मिळवून दिला. ५७ चेंडू राखत ८ विकेटने कोलकाताच्या संघाने हैदराबादच्या संघावर विजय मिळवून आयपीएल-२०२४ च्या ट्रॉफीवर नाव कोरले.

नाणेफेक जिंकून हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.हैदराबादच्या संघाकडून सलामीला ट्रेविस हेड व अभिषेक शर्मा फलंदाजीस आले. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूत मिचेल स्टार्कने अभिषेकशर्माला क्लिनबोल्ड केले. अभिषेक श्रमाने दोन धावा केल्या. पाठोपाठ दुसऱ्या षटका अखेरीस वैभव अरोराच्या गोलंदाजीवर रहमानुल्ला गुरबाझने ट्रेविस हेडला झेल बाद करत शून्य धाव संख्येवर माघारी पाठविले.चौथ्या शतकात राहुल त्रिपाठी रमनदीप सिंग करवी नऊ धावांवर झेल बाद झाला. सातव्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर रहमानुल्ला गुरबाझने नितीशकुमार रेडडीला झेल बाद केले. नितीशकुमार ने १० चेंडूत १३ धावा केल्या.

अकराव्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर मिचेल स्टार्कने एडन मार्करमला झेल बाद केले. एडन मार्करमने २३ चेंडूत २० धाव केलेल्या. बाराव्या षटकाच्या अखेरीस वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर सुनील नरेनने शाहबाज अहमदला झेल बाद केले. शाहबाज अहमदने ७ चेंडूत ८ धावा केल्या. तेराव्या षटकात आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर अब्दुल समदला रमानुल्ला गुरबाजने झेल बाद केले. अब्दुल समदने ४ चेंडूत ४ धावा केल्या. १५ व्या शतकात हर्षित राणाने हेनरिक क्लासेनला क्लीन बोल्ड करत १७ धावांवर तंबूत परत पाठविले. सुनील नरेनच्या गोलंदाजीवर जयदेव उनाडकट पायचीत झाला. जयदेव उनाडकटने एकूण ४ धावा केल्या. एकोनावीसाव्या षटकातच हैदराबादच्यासंघाचे सर्व फलंदाज बाद होऊन ११३ धावा केल्या.

कोलकाताच्या संघाकडून रहमानुल्ला गुरबाझ व सुनील नरेन प्रथम फलंदाजीस आले.सामन्याच्या दुसऱ्या शतकात पॅॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर सुनील नरेनला शाहबाज अहमदने झेल बाद केले सुनील नरेनने २ चेंडूत ६ धावा केल्या.रहमानुल्ला गुरबाझ व व्यंकटेश अय्यरच्या जोडीने कोलकाताच्या संघास विजयाकडे नेत असताना ९ व्या षटकात शाहबाज अहमदच्या गोलंदाजीवर रहमानुल्ला गुरबाझ पायचीत झाला. रहमानुल्ला गुरबाझने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या. व्यंकटेश अय्यर ने २६ चेंडूत नाबाद ५२ धावा करत कोलकाताच्या संघाला विजय मिळवून दिला. ५७ चेंडू राखत ८ विकेटने कोलकाताच्या संघाने हैदराबादच्या संघावर विजय मिळवून आयपीएल-२०२४ च्या ट्रॉफीवर नाव कोरले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या