मुंबई | Mumbai
आयपीएल २०२५ (IPL 2025) मध्ये आज (सोमवारी) विशाखापट्टणम येथील डाॅ वायएस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स संघासमोर दिल्ली कॅपिटल्स संघाचे (Delhi Capitals vs Lucknow Super Giants) आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स संघाचे हे दुसरे घरचे मैदान आहे.
लखनौ सुपर जायंट्स सघाची धुरा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतकडे (Rishabh Pant) असणार आहे.तर दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद अक्षर पटेल (Akshar Patel) सांभाळणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात आले आहेत. हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास लखनौ सुपर जायंट्स ने ३ तर दिल्ली कॅपिटल्स ने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंट्स प्रथमच या मैदानावर सामना खेळणार आहे.
दरम्यान, विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील डाॅ वायएस राजशेखर रेड्डी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल मानली जाते. या मैदानावर आतापर्यंत १५ आयपीएल क्रिकेट सामने खेळविण्यात आले असून, प्रथम फलंदाजी करताना संघाने ८ तसेच धावांचा पाठलाग करताना संघाने ७ सामन्यात विजय संपादन केला आहे.या मैदानावरील २७२-७ ही सर्वाधिक धावसंख्या असुन, ही धावसंख्या कोलकाता नाईट रायडर्स ने आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरूध्द उभारली होती. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यावर पावसाचे सावट आहे. सामन्याच्या दिवशी ६१ टक्के पावसाची (Rain) शक्यता आहे. दुपारी हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.