Friday, April 25, 2025
Homeक्रीडाIPL 2025 GT vs RR : राजस्थानसमोर गुजरातला रोखण्याचे आव्हान; कोण मारणार...

IPL 2025 GT vs RR : राजस्थानसमोर गुजरातला रोखण्याचे आव्हान; कोण मारणार बाजी?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League ) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स संघाचा सामना राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) संघाशी होणार आहे. आयपीएल स्पर्धेचा आजचा हा २३ वा सामना असून तो दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात येणार आहे.

- Advertisement -

गुजरात टायटन्सने यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करत ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळविला आहे. त्यामुळे गुणतालिकेत (Scoreboard) ६ गुणांसह गुजरात टायटन्स दुसऱ्या स्थानावर आहे. आता राजस्थान रॉयल्स विरूध्द विजय संपादन करून विजयी चौकार मारण्याची संधी गुजरात टायटन्सकडे असणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळविण्यात आले असून, गुजरात टायटन्सने ५ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर राजस्थान रॉयल्सने ४ सामने खेळले असून, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद विरूध्द संघाला पराभवाचा (Defeat) सामना करावा लागला आहे.

मात्र चेन्नई सुपरकिंग्ज आणि पंजाब किंग्जविरूध्द विजय संपादन केल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाला पराभूत करून विजयी हॅट्रिक करण्याच्या इराद्याने राजस्थान रॉयल्स मैदानावर उतरणार आहे. गुजरात टायटन्स संघाकडून सलामी फलंदाज साई सुदर्शनने सर्वाधिक धावा केल्या असून, मोहम्मद सिराजने सर्वाधिक बळी घेतले आहेत. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाबद्दल बोलायचे झाल्यास कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) ४ सामन्यात १३७ धावा केल्या आहेत. तसेच ध्रुव जुरेल ने ११९ धावा केल्या आहेत. तर वनिंदु हसरंगाने सर्वाधिक ६ बळी घेतले आहेत.

दरम्यान, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३७ सामने खेळविण्यात आले असून, प्रथम फलंदाजी करताना संघाने १७ आणि धावांचा पाठलाग करताना संघाने २० सामने जिंकले आहेत. तर २४३-५ ही सर्वाधिक धावसंख्या (Score) ठरली आहे. यंदाच्या हंगामात २ सामने खेळले गेले असून, प्रथम फलंदाजी करताना संघाने २ सामने जिंकले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...