Thursday, April 10, 2025
Homeमुख्य बातम्याIPL 2025 : आज DC विरुद्ध RCB लढत; कोण मारणार विजयी चौकार?

IPL 2025 : आज DC विरुद्ध RCB लढत; कोण मारणार विजयी चौकार?

मुंबई | Mumbai

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (गुरूवारी) बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूध्द दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये (Royal Challengers Bangalore vs Delhi Capitals) सामना खेळविण्यात येणार आहे. बंगळूरु संघाचे कर्णधारपद रजत पाटीदारकडे तर अक्षर पटेलकडे दिल्ली कॅपिटल्स संघाची धुरा आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२५ स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबाद,लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघाना पराभवाचा धक्का देऊन आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. दुसरीकडे बंगळूरु संघाने रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा धक्का देऊन इतिहास रचला आहे. मात्र, गुजरात टायटन्स विरूध्द आपल्या घरच्या मैदानावर बंगळूरु संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

त्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी बंगळूरू सज्ज असणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि बंगळूरु विजयी चौकार मारण्यासाठी सज्ज असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये ३१ सामने खेळविण्यात आले असून, बंगळुरू संघाचा हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास दबदबा राहिला आहे. बंगळूरु संघाने १९ आणि दिल्ली कॅपिटल्सने ११ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर १ सामना पावसामुळे (Rain) रद्द करण्यात आला आहे.

तर बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) १२ सामने दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आले असून, बंगळुरू संघाने ७ सामन्यात विजय संपादन केला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने ४ सामन्यात विजय संपादन केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास बंगळूरु संघाने ४ तर दिल्ली कॅपिटल्सने १ विजय संपादन केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Vijay Wadettiwar : तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वडेट्टीवार संतापले; म्हणाले, “मंगेशकर कुटुंब...

0
मुंबई | Mumbai पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गर्भवती महिलेचा मृत्यू (Death) झाल्याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या महिलेचा मृत्यू दीनानाथ...