Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIPL 2025 Second Qualifier : अंतिम फेरीच्या तिकिटासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब...

IPL 2025 Second Qualifier : अंतिम फेरीच्या तिकिटासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये लढत; कुणाचे पारडे जड?

मुंबई | Mumbai 

इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (रविवारी) १ जून २०२५ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स विरूध्द पंजाब किंग्ज संघांमध्ये (Mumbai Indians and Punjab Kings) खेळविण्यात येणार आहे. या सामन्यासाठी पंजाब किंग्ज संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे तर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये ३३ सामने खेळविण्यात आले असून, मुंबई इंडियन्सने १७ तर पंजाब किंग्जने १६ सामन्यात विजय संपादन केला आहे.

- Advertisement -

आयपीएल २०२५ (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर मध्ये बंगळूरु संघाने पंजाब किंग्ज विरूध्द ८ गडी राखून दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज संघातील सामना नॉकआऊट असणार आहे. तसेच पराभूत संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. तर विजेत्या संघाला अंतिम सामन्यात आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संधी असणार आहे.याआधी जयपूर येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्स संघाला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्याची संधी मुंबई इंडियन्सकडे असणार आहे.

YouTube video player

दोन्ही संघांमध्ये खेळविण्यात आलेल्या अखेरच्या ५ सामन्यांच्या निकालावर नजर टाकल्यास पंजाब किंग्जने ३ आणि मुंबई इंडियन्सने २ सामन्यात विजय संपादन केला आहे. तसेच मुंबई इंडियन्समध्ये फलंदाजीत रोहित शर्मा, सूर्य कुमार यादव, जॉनी बेअरस्टो, नमन धीर, रायन रिकलटन या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे गुजरात टायटन्स विरूध्द सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) ९ चेंडूत २२ धावा काढून आपल्याला सूर गवसला असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याशिवाय तिलक वर्माही लयीत परतला आहे. तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचड ग्लिसन, मिचेल सॅंटनेर, हे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत.

दुसरीकडे पंजाब किंग्जचे श्रेयस अय्यर, प्रभसीमरनसिंग, प्रियांश आर्या, नेहाल वढेरा, जॉश इंग्लिश हे फलंदाज लयीत आहेत. गोलंदाजीत (Bowling) अर्शदिपसिंग मार्को यानसेन, युझवेंद्र चहल, हरप्रीत ब्रार‌‌‌ हे सर्व गोलंदाज संघाला सातत्याने विकेट्स काढून देत आहेत.दोन्ही संघांमध्ये प्रचंड संतुलन असल्याने एकमेकांना कडवी झुंज देण्यासाठी दोन्ही संघांमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...