Friday, June 20, 2025
Homeक्रीडाIPL 2025 RCB Champion: RCBने सामना जिंकताच संघावर पैशांचा पाऊस, पंजाबलाही मिळाली...

IPL 2025 RCB Champion: RCBने सामना जिंकताच संघावर पैशांचा पाऊस, पंजाबलाही मिळाली भली मोठी रक्कम; कोणाला किती मिळाले पैसे?

मुंबई | Mumbai
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १८ वर्षांनंतर आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. आरसीबीने फायनलमध्ये पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले. विराटने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. बेंगळुरूने दमदार गोलंदाजीच्या जीवावर आयपीएलचा अंतिम सामना जिंकला. तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी जिंकल्यामुळे आरसीबीच्या प्रत्येक खेळाडूसाठी आणि फॅनसाठी हा विजय खास आहे. विजय जवळ आल्यानंतर विराट कोहलीला भावना अनावर झाल्या त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर विजयाच्या इतक्या जवळ येऊनही पराभव स्विकारावा लागल्यामुळे पंजाबचे खेळाडू निराश झाले. या विजयासाठी आरसीबीच्या संघाला किती पैसे मिळाले आणि पंजाबल बक्षीस म्हणून किती रक्कम मिळाली ? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

आयपीएल २०२५ चा चषक जिंकणाऱ्या आरसीबीला २० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मागील वर्षी केकेआरने देखील २० कोटी रुपये जिंकले होते. एकीकडे बंगळुरुवर पैशांचा पाऊस सुरु असताना पंजाब किंग्सवरही पैशांचा वर्षाव सुरु आहे. उपविजेत्या पंजाबला १३ कोटी रुपये मिळाले आहेत. तर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सलाही पैसे मिळाले. त्यांना अनुक्रमे ७ कोटी आणि ६.५ कोटी रुपये मिळाले.

- Advertisement -

आयपीएल मधील टॉप ४ संघाच्या विजेती रक्क
विजेता संघ (रॉयल चॅलेंजर्स बँगलोर )- २० कोटी रुपये
उप-विजेता संघ (पंजाब किंग्स)- १३ कोटी रुपये
तिसऱ्या स्थानी असलेला संघ (मुंबई इंडियन्स )- ७ कोटी रुपये
चौथ्या स्थानी असलेला संघ (गुजरात टायटन्स)- ६.५ कोटी रुपये

यांनाही मिळाले पुरस्कार
सीझनमध्ये सर्वाधिक धावा (ऑरेंज कॅप)- साई सुदर्शन (७५९ धावा), १० लाख रुपये
सीझनमध्ये सर्वाधिक विकेट (पर्पल कॅप)- प्रसिद्ध कृष्णा (२५ विकेट), १० लाख रुपये
इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीजन- साई सुदर्शन, १० लाख रुपये
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द सीजन- सूर्यकुमार यादव, १५ लाख रुपये
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन- वैभव सूर्यवंशी, Tata Curv ईवी कार
सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स- निकोलस पूरन, १० लाख रुपये
सीझनमध्ये सर्वाधिक डॉट बॉल- मोहम्मद सिराज, १० लाख रुपये
सीझनमधील सर्वोत्तम कॅच- कामिंदु मेंडिस, १० लाख रुपये
सीझनमध्ये सर्वाधिक चौकार- मोहम्मद सिराज, १० लाख रुपये
साई सुदर्शन, १० लाख रुपये
फेअर प्ले अवॉर्ड: चेन्नई सुपर किंग्स
पिच अँड ग्राउंड अवॉर्ड : DDCA (दिल्ली डिस्ट्रिक्ट एंड क्रिकेट एसोसिएशन), ५० लाख रुपये

आयपीएलच्या २०२५ च्या सत्रातील अखेरच्या सामन्यात आरसीबीने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाले. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने १९० धावांचे आव्हान उभे केले. या डावात आरसीबीच्या एकाही खेळाडूने अर्धशतक ठोकले नाही. तरीही आरसीबीने १९० धावा केल्या. आरसीबीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने २० षटकात १८४ धावा केल्या.

आरसीबीने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या संघातील खेळाडूंचे विकेट एकामागोमाग गेले. फक्त पंजाबमधील शंशाकने ३० चेंडूत ६१ धावा कुटल्या. पहिल्यांदा संधी चालून आलेल्या पंजाब किंग्सने विजयाची संधी गमावली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...