Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाआयपीएल मेगा लिलावावरही करोनाचं सावट?

आयपीएल मेगा लिलावावरही करोनाचं सावट?

मुंबई | Mumbai

देशभरात करोना (Corona) रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ झाल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) भारताच्या डोमेस्टिक स्पर्धांपैकी लोकप्रिय असलेली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे…

- Advertisement -

बीसीसीआयने २ आठवड्यांपूर्वी आयपीएल १५ च्या (IPL) मेगा लिलावाच्या (Mega Auction) तारखा आणि ठिकाण जाहीर केले आहे. तेव्हा भारतातील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे चित्र असल्यामुळे यंदाची आयपीएल भारतातच (India) आयोजित करण्यात येणार असल्यामुळे आयपीएल चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

बीसीसीआयने यंदाच्या लिलावाचे आयोजन ११-१३ फेब्रुवारी दरम्यान बंगळूरमध्ये (bangalore) करण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र करोना रुग्णसंख्येने पुन्हा एकदा जोरदार उसळी मारल्यामुळे आता आयपीएल लिलावावरही संकट निर्माण झाले आहे.

त्यामुळे आयपीएल लिलावाचे ठिकाणही पुन्हा एकदा बदलले जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात ८ नव्हे तर १० संघ आपले विजेतेपद मिळवण्यासाठी आयपीएलच्या (IPL) रणधुमाळीत उतरणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल लिलावसाठी कोच्ची, मुंबई, कोलकाता ही शहरे पर्याय म्हणून निवडलेली आहेत. पण या तिन्ही ठिकाणीही करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वध होताना दिसत आहे. त्यामुळे गरज पडल्यास आयपीएल लिलावाचे ठिकाण आणि तारखेतही मोठा बदल केला जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआय सर्व संघांशी लिलावासंदर्भात चर्चा करत आहे. त्यामुळे करोनाच्या संकटात परिस्थिती हाताबाहेर गेल्यास उर्वरीत पर्यायांचा विचार केला जाईल असे सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

बीसीसीआयने १७ जानेवारी २०२२ पर्यंत सर्व संघांना आपल्या संघातील खेळाडूंची नावे पाठवण्यास सांगितले आहे. लिलावात १००० खेळाडूंची नावे येतील अशी बीसीसीआयला अपेक्षा आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या