मुंबई | Mumbai
आयपीएल २०२६ (IPL 2026) पूर्वी ५ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्जने मोठा धमाका केला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळताना दिसणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि राजस्थान रॉयल्सकडून जडेजा खेळला आहे. तर संजू सॅमसनला आपल्या संघात सामील करून चेन्नई सुपर किंग्जने रवींद्र जडेजा आणि सॅम करनला ट्रेड विंडोद्वारे राजस्थान रॉयल्सकडे सोपविले आहे.
चेन्नई सुपर किंग्जसंघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, हा निर्णय घेणे खूप अवघड होते. रवींद्र जडेजा १० वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्ज कडून खेळला आहे. तसेच राजस्थान रॉयल्स संघाकडून रवींद्र जडेजाने आयपीएल स्पर्धेमध्ये पदार्पण केले होते. रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केले आहे. सॅम करनने २८ सामने खेळले असून, आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य राहिला आहे.
२०१८-२०२१-२०२३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. रवींद्र जडेजाने १५० बळी घेतले असून,२३०० धावा केल्या आहेत. संजू सॅमसनबद्दल (Sanju Samson) बोलायचे झाल्यास त्याने आयपीएल स्पर्धेमध्ये ४५०० धावा केल्या असून,२०२१ ते २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषविले होते.
तर अनुभवी फलंदाज नितीश राणा (Nitish Rana) आगामी आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघांमध्ये पार पडलेल्या ट्रेड विंडो द्वारे ४.२ कोटी रुपये खर्च करून दिल्ली कॅपिटल्स संघाने हा मोठा बदल केला आहे. नितीश राणाने आयपीएल स्पर्धेमध्ये १०० सामने खेळले असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाचे कर्णधारपद भूषविले आहे.
तसेच आयपीएल स्पर्धेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे. नितीश राणाच्या बदली खेळाडू म्हणून डोनोवन फेरेराला ट्रेड विंडोद्वारे राजस्थान रॉयल्सने संघात स्थान दिले आहे. विशेष म्हणजे ड़ोनोवन फरेराने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये पदार्पण केले होते.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला रिलीज केले असून, तो आता लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. लखनऊने त्याला३० लाखांच्या मूळ किमतीवर घेतले आहे. तर २०२५ मध्ये एसआरएचसाठी फारसा चमक न दाखवलेला मोहम्मद शमी आता लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणार आहे. लखनऊने त्याला तब्बल १० कोटींमध्ये विकत घेतले आहे.
सलिल परांजपे, नाशिक





