Saturday, March 29, 2025
Homeनगरपारनेरचे भूमीपूत्र IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

पारनेरचे भूमीपूत्र IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघातात निधन

तेलंगणातील नागरकुरलूनमध्ये काळाचा घाला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) तालुक्याचे भूमीपूत्र असणारे आयपीएस सुधाकर पठारे (IPS Dr. Sudhakar Pathare) यांचे शनिवारी अपघाती निधन (Accident Death) झाले आहे. तेलंगणातील (Telangana) श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात (Car Accident) झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुधाकर पठारे हे ज्या गाडीतून प्रवास करत होते, त्या गाडीची ट्रकसोबत धडक झाली आणि हा अपघात झाला. पठारे हे 2011 बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांच्या यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलासह (Maharashtra Police Force) पारनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

वाळवणे (ता. पारनेर) (Walwane) येथील सुधाकर पठारे सध्या मुंबई पोलिसमध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. सुधाकर पठारे हे ट्रेनिंगसाठी हैदराबादमध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांच्या एका नातेवाईकासह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असता हा अपघात झाला. या अपघातात पठारे यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती तेलंगणा पोलिसांना मुंबई पोलिसांना कळवली आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली ते जिल्हा विशेष लेखापरीक्षक झाले. यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची निवड झाल्यानंतर पोलिस खात्यातच ते रमले. आतापर्यंत त्यांनी पोलिस उपअधीक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून चंद्रपूर, वसई तर पोलिस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे. पोलिस उपायुक्त म्हणून मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई, ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे. डॉ. पठारे यांनी पोलिस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईंचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलिस दलात अनेक विविध उपक्रम राबवले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

0
मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा अनन्यसाधारण आणि राष्ट्रधर्माचा वसा आहे. हा वसा घेऊन राज्याच्या, देशाच्या विकासाचा एकजुटीने निर्धार...