Friday, May 29, 2026
Homeदेश विदेशइराणचा अमेरिकेवर गेल्या २४ तासांत जोरदार हल्ला; दोन लढाऊ विमानं पाडली, दोन...

इराणचा अमेरिकेवर गेल्या २४ तासांत जोरदार हल्ला; दोन लढाऊ विमानं पाडली, दोन हेलिकॉप्टरवर हल्ला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या ३६ दिवसांपासून आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धात गेल्या २४ तासांमध्ये जबरदस्त उलथापालथ दिसून आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये इराणने अमेरिकेची दोन लढाऊ विमाने पाडली आहेत. तर बचाव मोहिमेदरम्यान, दोन ब्लॅक हॉक विमानांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी दोन विमाने पाडल्या गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पाडण्यात आलेल्या विमानाच्या वैमानिकांना वाचवण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

इराणमधील मोहिमेदरम्यान, अमेरिकेला झालेल्या नुकसानीची माहिती देताना इराणी प्रसारमाध्यमांनी काही फोटो प्रसिद्ध केले आहे. तसेच कुवेत येथील कॅम्प बुहरिंग येथे इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकन सैन्याचे एक बोईंग सीएच-४७ चिनूक हे बलाढ्य हेलिकॉप्टर उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे.

एका वृत्तसंस्थेच्या बातमीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, खातम अल-अंबिया मुख्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “इराणच्या मध्यवर्ती भागात एका नवीन आयआरजीसी एरोस्पेस फोर्स एअर डिफेन्स सिस्टमने अमेरिकेचे दुसरे पाचव्या पिढीतील F-35 विमान पाडले. विमानाला बसलेली धडक आणि क्रॅशनंतर झालेला मोठा स्फोट पाहता, वैमानिक विमानाच्या बाहेर इजेक्ट झाल्याची शक्यता कमी आहे.” दरम्यान काही वेळानंतर या घटनेबद्दल वेगळी अपडेट समोर आली होती.

Baramati ByPoll Elections: बारामती पोटनिवडणुकीसाठी जोरदार राजकीय हालचाली; सुनेत्रा पवारांचा उध्दव ठाकरेंना फोन, दोघांमध्ये काय चर्चा झाली?

इराणच्या प्रसारमाध्यमांनी दावा केल्याप्रमाणे शुक्रवारी सुरुवातीला पाडण्यात आलेले विमान हे एफ-३५ नव्हते तर ते एफ-१५ हे लढाऊ विमान होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. इराण सरकारने देखील आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून हे विमान पाडल्याचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

अधिक माहितीनुसार अमेरिकेचं एक एफ-१५ई हे लढाऊ विमान इराणमध्ये हल्ला करत असताना कोसळलं होतं. त्यात दोन पायलट होते. त्यातील एकाला वाचवण्यात आलं आहे. तर दुसरा बेपत्ता आहे. तो इराणमध्ये लपून असल्याची शक्यता आहे. तसेच इराणने या पायलटाची माहिती देणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. या विमानातील बेपत्ता पायलटला शोधण्यासाठी निघालेल्या दोन एचएच-६०डब्ल्यू जॉली ग्रीन II ही हेलिकॉप्टर इराणी गोळीबाराच्या तडाख्यात सापडली. यात काही सैनिक जखमी झाले.

अमेरिकेचे बेपत्ता पायलटचा शोध घेण्यासाठी गेलेल्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरवर इराणने हल्ला केला. मात्र या हवाई हल्ल्यातून हे हेलिकॉप्टर सुरक्षित बाहेर पडल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली.

ताज्या बातम्या

Shirdi : उपोषण स्थगित करण्याची आज विनंती करणार – ना. विखे...

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून सकारात्मक कार्यवाही सुरू असून आज...