नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराणने इस्त्रायलचा धोका पाहता त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी नवा आदेश काढला आहे. सरकारी अधिकारी, सुरक्षा टीमने पब्लिक कम्युनिकेशन आणि टेलिकम्युनिकेशनचा प्रयोग करू नये. इराणच्या सायबर सुरक्षा कमांडकडून या उपकरणावर पूर्णत: निर्बंध आणण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. सध्या इस्रायल आणि ईराणमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. इस्रायल आणि ईराण दोन्ही देश एकमेकांवर आक्रमण करत आहे. इस्रायलकडून केलेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत इराणचे सैनिकी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ मृत्यू मुखी पडल्याचा दावा केला आहे. याच कारणामुळे शत्रू राष्ट्राचा सामना करण्यासाठी इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इस्रायलला नेमकं कसं रोखलं जाऊ शकतं, हे इराणने शोधलं असून आपल्या अधिकाऱ्यांना मोठा आणि महत्त्वाचा आदेश दिला आहे.
इस्रायली हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर इराणच्या सायबर कमांडने हे आदेश जारी केले. एका न्यूज एजन्सीनुसार, इराणमध्ये टार्गेटेड मर्डरसाठी यहुदी राष्ट्र त्याचा वापर करू शकतो ही भीती आहे. त्याशिवाय मोबाईल फोनही ट्रॅक केले जाऊ शकतात. हिजबुल्लाह सदस्यांविरोधात पेजर हल्ला याआधी इस्त्रायलनेच केला होता. इस्रायलने अलीकडेच इराणच्या अणुशास्त्रज्ञांना मारण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. अशा परिस्थितीत संवेदनशील ठिकाणी मोबाईल फोन बंद केल्याने देखील लोकेशन ट्रॅकिंग थांबवता येणार नाही. म्हणूनच सर्व अधिकाऱ्यांना अशी उपकरणे वापरण्यास सांगण्यात आले आहे जी अँटी-ट्रॅकिंग आहेत, म्हणजेच ज्यांना ट्रॅक करता येत नाही असे.
इराणच्या IRGC शी संबंधित असलेल्या फार्स न्यूज एजन्सीने अनेक दावे केले आहेत. इस्रायलने नुकतेच इराणच्या अणूवैज्ञानिकांना मारण्यासाठी हीच पद्धत वापरली. त्यामुळे इराणमधील संवेदनशील स्थानांवर मोबाईल फोन बंद करण्याचा आदेश इराणी अधिकाऱ्यांना देण्यात आलाय.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





