Thursday, February 5, 2026
Homeदेश विदेशIran Israel Conflict: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा; "तातडीने शांतता,...

Iran Israel Conflict: अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्रपतींशी चर्चा; “तातडीने शांतता, सुरक्षा आणि…”

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्त्रायल आणि इराण यांच्या युद्धात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाच्या बी-2 बॉम्बर विमानांनी काल रात्री इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर हल्ले केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवडे युद्धात लक्ष देणार नाही, असे म्हटले होते. मात्र, दोनच दिवसात अमेरिकेने इस्त्रायलच्या बाजूने इराणवर हल्ले केले. यानंतर इराणने अमेरिकेला बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इराणचे राष्ट्रपतींशी फोनवर चर्चा केली.

इस्रायल इराण युध्दात अमेरिकेने एन्ट्री करताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्याशी चर्चा केली करुन शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा असे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्रपतींसोबत काय संवाद झाला याची माहिती सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन दिली आहे.

- Advertisement -

मी इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियान यांच्यासोबत चर्चा केली. सद्याच्या स्थितीवर आम्ही सविस्तर चर्चा केली. सध्याच्या वाढत्या तणावाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. मी पुन्हा आवाहन केले की आताची स्थिती शांत केली पाहिजे. संवाद आणि राजनैतिक चर्चेतून पुढे जाणे आवश्यक असून त्या भागात तातडीने शांतता, सुरक्षा आणि स्थिरता बहाल करणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

YouTube video player

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केला आहे आणि १४ महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. इराणी क्षेपणास्त्रे हैफा आणि तेल अवीवमधील लष्करी आणि निवासी ठिकाणांवर पडली आहेत.

दुसरीकडे, इराणे म्हटले की आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्ण ताकदीने उत्तर देणार आहोत. IAEA वर देखील इराणने आरोप केले. ही संस्था युद्ध भडकवणाऱ्यांची बाजू घेते, असे देखील इराणने म्हटले. अमेरिकेच्या कारवाईनंतर आंतरराष्ट्रीय संस्थांची शांतता भविष्यातील अभूतपूर्व संकटाला जन्म देईल. अमेरिकेनेच चर्चा सुरु असताना इराणसोबत युद्ध सुरु केले आहे हे आंतरराष्ट्रीय संस्थांनी विसरु नये असे म्हटले. संयुक्त राष्ट्रांनी आपात्कालीन अधिवेशन बोलवावे, असे देखील इराणने म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Shrigonda : खामकरवाडी सहकारी सोसायटीत 1 कोटी 12 लाखांचा घोटाळा

0
श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda तालुक्यातील खामकरवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत आर्थिक घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेच्या चेअरमनने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर प्रत्यक्षात...