Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशIran-Israel Conflict: इराण-इस्रायलचे १२ दिवसांचे युध्द संपले; ट्रम्प यांची घोषणा, पण इराण...

Iran-Israel Conflict: इराण-इस्रायलचे १२ दिवसांचे युध्द संपले; ट्रम्प यांची घोषणा, पण इराण म्हणतो…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध संपल्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधीसाठी एकमत झाले आहे. पुढील १२ तासांत १२ दिवसांचे युद्ध संपले असे अधिकृत समजले जाईल. १२ दिवसांच्या या युद्धाला जग सलाम करेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहाटे ३.३० वाजता इराण आणि इस्रायल यांच्यात युध्दबंदीचा दावा केला. मात्र हा दावा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी फेटाळला आहे. इस्रायलसोबत युद्धबंदीच्या वृत्ताला त्‍यांनी नकार दिला आहे. इस्रायलसोबत अद्याप कोणताही अंतिम युद्धबंदी करार झालेला नाही. इस्रायलने आमच्‍यावर बेकायदेशीर हल्ले थांबवले तर इराण प्रत्युत्तर देणार नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

- Advertisement -

https://truthsocial.com/@realDonaldTrump/114734934153569653/embed

YouTube video player

इस्रायलने पहिल्यांदा इराणवर हल्ला केला होता. इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रे आणि लष्करी तळावर हवाई हल्ले केले. त्यामुळे संतापलेल्या इराणने इस्रायलवर पलटवार केला. दोन्ही देशांतील संघर्ष विकोपाला गेला. त्यात अमेरिकेनेही इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हंटले आहे?
इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाली आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पहाटे ३:३० वाजता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्‍ट करत केला. त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिले की, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, इस्रायल आणि इराणमध्ये १२ तासांत म्हणजेच आतापासून ६ तासांत पूर्ण युद्धबंदी लागू होईल. इराण पहिल्या १२ तासांसाठी शस्त्रे ठेवेल आणि त्यानंतर पुढील १२ तासांसाठी इस्रायल शस्त्रे ठेवेल. दरम्‍यान, न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यानेही युद्धबंदीबाबत ट्रम्पच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही.

“अधिकृतपणे इराण युद्धविरामाची सुरूवात करेल, तर १२ तासांनंतर इस्रायल. आणि २४ तासांनी १२ दिवसांचे युद्ध संपल्याबद्दल जगाकडून सलाम केला जाईल. या शस्त्रसंधीदरम्यान, दुसरा देश शांतता आणि सन्मान राखेल. या आधारावर की सर्व काही तसेच होईल, जसे व्हायला हवे. मी दोन्ही देशांना, इस्रायल आणि इराणचे अभिनंदन करतो की, त्यांच्याकडे १२ दिवसांचे युद्ध संपवण्यासाठी सहनशक्ती, धाडस आणि बुद्धिमत्ता आहे”, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

“हे एक असे युद्ध आहे, जे अनेक वर्षे चालले असते आणि पूर्ण मध्य पूर्व आशियाला नष्ट करू शकले असते. पण, असे झाले नाही आणि तसे कधीही होणार नाही. ईश्वराची कृपा इस्रायलवर राहो, ईश्वराची कृपा इराणवरही राहो. मध्य पूर्वला ईश्वराचा आशीर्वाद मिळो. ईश्वर अमेरिकेला आणि संपूर्ण जगाला आशीर्वाद देवो”, असे म्हणत ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली आहे.

शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ
इराणच्या परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे की, – इस्रायलला शिक्षा देण्यासाठी इराणची लष्करी कारवाई शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजेच पहाटे ४ वाजेपर्यंत सुरू राहिली. आमच्या सैनिकांनी शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. ते त्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत देशाचे रक्षण करण्यास तयार आहेत. तसेच त्‍यांनी इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप कोणताही औपचारिक युद्धबंदी करार झालेला नाही, असेही स्‍पष्‍ट केले.

इस्रायलकडून प्रतिक्रिया नाही
इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यानेही युद्धबंदीबाबत ट्रम्पच्या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. दरम्‍यान, इस्‍त्रायलच्‍या लष्कराने स्पष्ट केले आहे की, देशात आधीच लागू असलेले नियम तेच राहतील. याचा अर्थ असा की लोकांना अजूनही एकाच ठिकाणी एकत्र येण्याची परवानगी नाही, शाळा आणि कार्यालये बंद राहतील आणि प्रत्येकाने सुरक्षिततेच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. सरकार किंवा सैन्याकडून कोणतेही नवीन निर्देश येईपर्यंत जनतेला सतर्क राहण्यास आणि त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...