Saturday, September 12, 2026
Homeदेश विदेशमध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम; रुपया डॉलरपुढे ९२वर कोसळला, भारतीय रुपयाची ऐतिहासिक पडझड

मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम; रुपया डॉलरपुढे ९२वर कोसळला, भारतीय रुपयाची ऐतिहासिक पडझड

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मध्यपूर्वेतील अमेरिका इराण इस्रायल देशांतील संघर्षामुळे तेलाच्या किमती भडकल्या असून आणि गुंतवणूकदारांनी सेफ-हेवन (सुरक्षित मानल्या जाणाऱ्या) मालमत्तांकडे धाव घेतल्याने, ४ मार्च रोजी भारतीय रुपयाने ९२ रुपये प्रति डॉलरचा टप्पा ओलांडून नवा निचांकी स्तर गाठला.

मागील सत्रात रुपया ९१.४० वर होता, तो आता डॉलरच्या तुलनेत ९२.१७ वर व्यापार करत आहे. सार्वजनिक सुट्टीमुळे ३ मार्च रोजी चलन आणि कर्जरोखे बाजार बंद होते.

- Advertisement -

Stock Market News : युद्धाची झळ! भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण, ९ लाख कोटी खाक

विश्लेषकांनी सांगितले की, “निर्यातदारांसाठी ही आता एक सुवर्णसंधी आहे, कारण ते आता त्यांच्या रोख येणाऱ्या रकमेची विक्री ९२ रुपयांपेक्षा जास्त दराने करू शकतात. दुसरीकडे, आयातदारांना आता डॉलर खरेदी करण्यासाठी भाव कमी होण्याची वाट पाहावी लागेल. रुपयाच्या बाबतीत आरबीआय काय पाऊल उचलते, याकडेही आमचे लक्ष असेल.”

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे केवळ आयात बिलच वाढत नाही तर महागाईही वाढते, चालू खात्यातील तूट वाढते आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढते, ज्यामुळे रुपयावर दबाव येतो. सोमवारी (२ मार्च) परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून ३५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली होती.

ताज्या बातम्या

BRICS

BRICS Summit 2026:’आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’ BRICS परिषदेतून PM मोदींचा संदेश,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित BRICS शिखर परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे स्वागत...