Wednesday, May 20, 2026
Homeदेश विदेशइस्रायलच्या 'साऊथ पार्स'वरील हल्ल्याचा सूड; इराणचा कतारच्या जगातील सर्वात मोठ्या LNG प्रकल्पावर...

इस्रायलच्या ‘साऊथ पार्स’वरील हल्ल्याचा सूड; इराणचा कतारच्या जगातील सर्वात मोठ्या LNG प्रकल्पावर भीषण हल्ला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मध्यपूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून बुधवारी इस्रायलने इराणमधील जगातील सर्वात मोठ्या ‘साऊथ पार्स’ गॅस फील्डवर भीषण हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे खवळलेल्या इराणने आखाती देशांमधील रास लाफानवर, क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणने तेल आणि वायू केंद्रांना लक्ष्य करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. इराणच्या या कारवाईत कतारमधील महत्त्वाच्या गॅस फिल्डचे मोठे नुकसान झाले असून सौदी अरेबियावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. इराण आणि कतारमधील गॅस फिल्डवर हल्ले झाल्याने जगभरातील गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम होण्याची भीती आहे.

इराणने सौदी आणि कतारमधील उर्जा आणि गॅस प्रकल्पाची राख करू असा इशारा दिला होता. यानंतर हा इशारा सत्यात उतरवत बुधवारी रात्री इराणने कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर, रास लाफानवर, क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यामुळे भीषण आग लागली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्कालीन पथके तात्काळ पाठवण्यात आली. कतारने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले आहे. दरम्यान इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हात झटकताना मला काहीच माहीत नसल्याचे म्हटले आहे. या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती, असाही दावा केला आहे. आता इस्त्रायलकडून ‘साउथ पार्स’ क्षेत्रावर कोणताही पुढचा हल्ला केला जाणार नाही, असे सांगत इराणला पुन्हा कतारवर हल्ला करू नये, असा गर्भित इशारा दिला आहे.

- Advertisement -

जगातील सर्वात मोठ्या LNG उत्पादन सुविधेवर हल्ला
कतारची सरकारी ऊर्जा कंपनी ‘कतार एनर्जी’ने दिलेल्या माहितीनुसार, रास लफान इंडस्ट्रियल सिटीमधील त्यांच्या मुख्य गॅस सुविधेवर इराणने हल्ला केला. या शहरात जगातील सर्वात मोठी LNG उत्पादन सुविधा आहे. कतारच्या गृह मंत्रालयाने रास लफानमध्ये भीषण आग लागल्याची पुष्टी केली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले असले तरी, मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सर्व देशांनी तणाव कमी करण्यासाठी काम केले पाहिजे
गॅस प्रकल्पावरील हल्ल्यानंतर कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, इराणने नागरिक आणि महत्त्वाच्या स्थळांना लक्ष्य करून “रेड लाइन ओलांडली” आहे. कतारने म्हटले आहे की, अशा हल्ल्यांमुळे संपूर्ण प्रदेशातील परिस्थिती चिघळू शकते आणि म्हणूनच, सर्व देशांनी तणाव कमी करण्यासाठी आणि शांतता टिकवण्यासाठी एकत्र काम केले पाहिजे.

संपादकीय : १९ मार्च २०२६ – संघर्षाची राख अन् संकल्पाची सिद्धी!

सर्व कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश
या हल्ल्यानंतर कतार आणि इराणमधील राजनैतिक संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. कतारने इराणच्या दूतावासातील लष्करी आणि सुरक्षा साहित्यासह सर्व कर्मचाऱ्यांना २४ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. इराणने कतारवर ५ बॅलिस्टिक मिसाइल्स डागल्याचा आरोप कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. इराणला ‘पर्सोना नॉन ग्रांटा’ घोषित करून कतारने कठोर पाऊल उचलले आहे.

या हल्ल्याबद्दल अमेरिकेला पूर्वकल्पना नव्हती
दरम्यान, ट्रम्प यांनी यांनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं आहे की, “मध्यपूर्वेत जे काही घडलं, त्या रागातून इस्त्रायलने इराणमधील ‘साउथ पार्स गॅस फिल्ड’ या महत्त्वाच्या केंद्रावर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात त्या केंद्राचा एक छोटा भाग बाधित झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या विशिष्ट हल्ल्याबद्दल अमेरिकेला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. तसेच, कतार या देशाचा या हल्ल्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता, की त्यांना याची पुसटशी कल्पना होती. दुर्दैवाने, इराणला ही वस्तुस्थिती माहित नव्हती. त्यामुळे इराणने विनाकारण आणि अन्यायकारक पद्धतीने कतारच्या ‘एलएनजी गॅस’ सुविधेवर हल्ला केला.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...