Monday, May 4, 2026
Homeदेश विदेशMiddle East Crisis: मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं जोरदार प्रत्यूत्तर; शेजारील 'या'...

Middle East Crisis: मोठी बातमी! इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं जोरदार प्रत्यूत्तर; शेजारील ‘या’ देशांवर डागल्या मिसाईल्स

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इस्रायल आणि इराण यांच्यात मोठे युद्ध पेटले आहे. इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर या संघर्षात अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. आता इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश संयुक्तपणे इराणवर हल्ले करत असल्याने जगात खळबळ उडाली आहे. इराणनेही आता इस्रायल आणि इमेरिकेला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलच्या अनेक महत्त्वाच्या भागात हल्ले केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार इराणने आतापर्यंत इस्रायलवर 105 क्षेपणास्त्र डागले आहेत. आज सकाळपासून इस्रायलने इराणची राजधानी तेहरानमध्ये क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये स्फोटांचे आवाज येत असून, आकाशात धूर पसरला आहे.

इराणमधील युद्धाचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या मिसाईल हल्ल्यानंतर इराणही आक्रमक झाला आहे. इराणने इस्रायलसह यूएई, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीनवर मिसाईल डागल्या आहेत. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्याला इराणकडून प्रत्युत्तर देण्यात आले. इराणचे बहरिनमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरु केले आहेत.इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशांनी हवाई हद्द बंद केली आहे.

- Advertisement -

मोठी बातमी! इस्रायलचा इराणच्या राजधानीवर थेट हल्ला, आकाशात धुराचे लोट पसरले

अमेरिकेकडून इराणमध्ये ‘शिल्ड ऑफ जुदा’ ऑपरेशनला सुरुवात
इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर या युद्धात अमेरिका आणि सीरियाने देखील उडी घेतली आहे. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी देखील इराणवर हल्ला करायला सुरुवात केली आहे. तर इराणच्या बाजुने सीरीया मैदानात उतरलं आहे. अमेरिकेकडून इराणमध्ये ‘शिल्ड ऑफ जुदा’ ऑपरेशनला सुरुवात केली आहे, याबाबतची माहिती स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.

इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले, शाळा, महाविद्यालयं बंद
इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीही हल्ल्यांना दुजोरा दिला आहे. तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून हा हल्ला केल्याचे इस्राइलकडून सांगण्यात आलेय. दुसरीकडे इराणकडून होणाऱ्या प्रतिहल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन इस्रायलमध्ये सायरन वाजू लागले आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयं बंद करण्यात आली आहेत. शिवाय लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना देण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पश्चिम

West Bengal Election 2026: पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर; मोदींनी झालमुरी खालेल्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपश्चिम बंगालमधील २९३ जागांसाठी आज होत असलेल्या मतमोजणीला सुरवात झाली असून या ठिकाणी चुरशीची लढत होताना दिसत आहे. ताज्या...