Saturday, June 13, 2026
Homeदेश विदेशमोजतबा खामेनींची प्रकृती चिंताजनक? एक पाय गमावल्याचा दावा, इराणच्या सुप्रीम लिडरसंदर्भात खळबळजनक...

मोजतबा खामेनींची प्रकृती चिंताजनक? एक पाय गमावल्याचा दावा, इराणच्या सुप्रीम लिडरसंदर्भात खळबळजनक दावा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आखाती देशात युद्धाचा भडका उडाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यानंतर या युद्धाची धग आखाती राष्ट्रांमध्ये पसरली आहे. येथील स्थिती आता भीषण झाली आहे. हे युद्ध धुमसत असताना आता इराणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी यांनी एक पाय गमावला असून, ते कोमात असल्याचा दावा केला जात आहे. त्यांच्यावर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते कोमामध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला त्याच हवाई हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जात आहे. ‘द सन’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा यांनी या हल्ल्यात एक पाय गमावला असून, सध्या ते कोमात आहेत, त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर जखमा झाल्याचंही या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. पण, इराणी अधिकारी आणि सरकारने हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. मोजतबा सुरक्षित असून, सर्वोच्च नेत्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे इराणने म्हटले आहे.

- Advertisement -

‘देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’चे आज उद्घाटन

नेमका दावा काय करण्यात आला आहे?
द सन’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मोजतबा खामेनी यांना तेहरानमधील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षेत आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. इराणचे आरोग्य मंत्री आणि नामवंत सर्जन मोहम्मद रजा जफरगंदी स्वतः त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ज्या हल्ल्यात आयतुल्लाह अली खामेनी यांचा मृत्यू झाला, त्याच हल्ल्यात मोजतबा हे देखील गंभीर जखमी झाले असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

सुप्रीम लीडरपदी नियुक्ती झाल्यानंतर ५ दिवसांनंतर त्यांचा पहिला संदेश समोर आला होता. पण तो टीव्हीवर एका अँकरने वाचून दाखवला. मोजतबा स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत. एवढंच नव्हे तर इराणच्या सरकारी टीव्हीवर अँकर्सनी त्यांचा उल्लेख ‘रमजान युद्धाचा जांबाज’ म्हणजेच ‘घायल योद्धा’ असा केला आहे, ज्यामुळे ते दुखापतग्रस्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे.

अमेरिका इस्रायलला गंभीर इशारा
इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोजतबा खामेनी यांनी पहिल्यांदाच संबोधन जारी करताना अमेरिका आणि इस्रायलला गंभीर इशारा दिला आहे. प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार असल्याचा गंभीर इशारा मोजतबा यांनी दिला. इराणच्या सरकारी माध्यमांनी मोजतबा खामेनी यांचा संदेश वृत्तवाहिनीवर वाचून दाखवला.

एआय निर्मित फोटो व्हायरल
“सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इराणी माध्यमांनी प्रसिद्ध केलेला आणि त्यांच्या नव्या सोशल मीडिया खात्यावर वापरण्यात आलेला फोटो एआय निर्मित असल्याचे समोर आले आहे. गुगलच्या सिंथआयडीने याची पडताळणी केली असता त्यात वॉटरमार्क आढळतात, यामुळे फोटो तयार करण्यासाठी गुगल एआयचा वापर केल्याचे दिसून येते”, असे बीबीसीचे पत्रकार शायन सरदारिझादेह यांनी एक्स वर पोस्ट केले आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...