Tuesday, September 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो'चे आज उद्घाटन

‘देशदूत इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो’चे आज उद्घाटन

नाशिककरांच्या गृहस्वप्नांना मिळणार बळ

- Advertisement -

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिककरांच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’ने पुढाकार घेतला असून, शुक्रवारपासून (दि.१३) ‘इंदिरानगर प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ ला दिमाखात सुरुवात होत आहे.

इंदिरानगरमधील रथचक्र हौसिंग सोसायटीजवळील अजय मित्र मंडळ पटांगण येथे या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे, संध्या कुलकर्णी, नगरसेवक अ‍ॅड. शाम बडोदे, अजिंक्य साने, आणि सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

गेल्या काही वर्षांत इंदिरानगर आणि परिसराने विकासाचा नवा टप्पा गाठला असून, उत्तम रस्ते, शाळा आणि रुग्णालयांच्या उपलब्धतेमुळे हा भाग नाशिककरांच्या पसंतीचा केंद्रबिंदू ठरला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागातील रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी वाढ होत असून, याच संधींचा लाभ ग्राहकांना करून देण्यासाठी या प्रदर्शनात इंदिरानगर, पाथर्डी फाटा, गोविंदनगर आणि अशोका मार्ग यांसारख्या वेगाने विकसित होणार्‍या भागातील नामवंत बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले आहेत.

प्रदर्शन रविवार, दि. १५ मार्चपर्यंत दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे. नाशिककरांना आपल्या बजेटनुसार आणि पसंतीनुसार दर्जेदार घरांची निवड करण्याची ही सुवर्णसंधी असून, नाशिककरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पपायाज नर्सरी या प्रदर्शनाचे पर्यावरणीय पार्टनर आहेत.

नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश
श्रीजी ग्रुप, सुविक बिल्डकॉन, रवी महाजन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, अनमोल नयनतारा, आनंद ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, श्याम ग्रुप, श्री दत्तकृपा बिल्डर्स, दीप कन्स्ट्रक्शन, यशश्री कन्स्ट्रक्शन, संकलेचा बिल्डर्स, आदित्य डेव्हलपर्स, आयएनडी डेव्हलपर्स, जयप्रसाद कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स एलएलपी, त्रिणीती रिअल्टर्स, सचिन पी. बागड इंजिनिअर्स, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, आशापुरी कन्स्ट्रक्शन्स.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; दोघांना...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati पेठ रोडवरील (Peth Road) म्हसरूळ परिसरात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थविरोधी पथकाने (Anti-Narcotics...