Tuesday, April 14, 2026
Homeदेश विदेशइराणला अमेरिकेची सर्वात मोठी अट मान्य? अमेरिकेकडून वाटाघाटीसाठी दुसऱ्या फेरीची घोषणा, युद्ध...

इराणला अमेरिकेची सर्वात मोठी अट मान्य? अमेरिकेकडून वाटाघाटीसाठी दुसऱ्या फेरीची घोषणा, युद्ध टळणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिका आणि इराण यांच्यात लवकरच चर्चेच्या दुसऱ्या फेरीची शक्यता आहे. इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते, असे म्हंटले जात आहे. पाकिस्तानसह तुर्कीए, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थीसाठी पुढे आले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने करारासंदर्भात पुन्हा उत्सुकता दर्शवली आहे. त्यांनी अमेरिकेला तसा संदेशही पाठवला आहे. तर, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनीही इस्लामाबाद चर्चेत काही प्रमाणात प्रगती झाल्याचे म्हटले आहे.

जे डी व्हान्स काय म्हणाले?
इराणसोबतच्या चर्चेबाबत अमेरिकेचा सूर बदलला आहे. अनेक गोष्टी योग्य दिशेने गेल्या, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मत व्यक्त केले आहे. सगळे चुकले असे नाही, बरंचसं चांगलेही झाले. दोन्ही देशांनी चर्चेत खूप प्रगती केली. इराण अमेरिकेला हवे तसे मान्य करत होते, असे जेडी व्हान्स म्हणाले.

- Advertisement -

अण्वस्त्रांच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वाटाघाटींमध्ये इराणने काही प्रमाणात प्रगती दर्शवली आहे. मात्र कराराच्या कालावधीवरून त्यांच्यात मोठी तफावत आहे. इराणने युरेनियम संवर्धन पाच वर्षांपर्यंत थांबवण्याचा प्रस्ताव दिला आहे, तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासन २० वर्षांच्या स्थगितीसाठी आग्रही आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Iran Toll On Indian Ships: होर्मुझ पार करण्यासाठी इराण भारताकडून टोल वसुली करतं का? इराणने स्पष्टच सांगितलं, सरकारलाच विचारा…

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, इराण एखादा करार करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. आम्हाला दुसऱ्या बाजूकडून एक संदेश प्राप्त झाला आहे. आम्ही त्यांच्यावर नाकेबंदी (निर्बंध) लादली आहे. त्यांचा कोणताही व्यापार सध्या सुरू नाही. इराणचा कोणताही व्यवसाय सध्या चालत नाही आणि आमचा तो तसाच ठेवण्याचा इरादा आहे. सध्या, तिथे कोणताही संघर्ष किंवा लढाई सुरू नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच इराणला अण्वस्त्रे बाळगण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही. जर इराणने अटी मान्य केल्या नाहीत, तर कोणताही करार होणार नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

चर्चेची तारीख निश्चित नाही
युद्धविराम झाल्यानंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांचे शिष्टमंडळांची २१ तास चर्चा चालली. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. मात्र, तरीही पुढील चर्चेचा मार्ग खुला असल्याचे संकेत मिळत आहेत, तसे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील बोलून दाखवले. चर्चेची पुढची फेरी होण्याची शक्यता असली तरी अद्याप कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स यांनी पाकिस्तान सोडण्यापूर्वी सांगितले की, दोन्ही बाजूंमध्ये अजूनही मोठे अंतर आहे. “आमच्या विचारांत खूप तफावत आहे… केवळ आताच नाही, तर खूप आधी पासूनच आमची मते जुळत नाहीत,” असे ते म्हणाले.

लवकरच चर्चेची दुसरी फेरी पार पडण्याची शक्यता
सीएनएनच्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी दुसऱ्या फेरीच्या चर्चेसाठी अंतर्गत तयारी करत आहेत. पुढील आठवड्यात सीझफायरची मुदत संपण्यापूर्वी ही बैठक पार पडू शकते. यासाठी जिनेव्हा आणि इस्लामाबाद ही दोन ठिकाणे चर्चेत असून १६ एप्रिल ही संभाव्य तारीख असू शकते. या प्रक्रियेत तुर्की देखील दोन्ही देशांमधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी इराणच्या युरेनियम संवर्धन कार्यक्रम कायमस्वरूपी बंदी घालण्याऐवजी २० वर्षांच्या स्थगितीचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय करारांतर्गत युरेनियम संवर्धन तयार करण्याचा आपला अधिकार इराणला सोडवा लागणार नाही. मात्र, इराणने पुन्हा एकदा कमी कालावधीच्या स्थगितीचा प्रस्ताव मांडला आहे. यापूर्वीही असे प्रस्ताव अपयशी ठरल्याने तणाव वाढला होता. या मुद्द्यावरील मतभेदांमुळे करार होऊ शकला नाही. मात्र, आता इराण अणुसंवर्धनावर काही तडजोड करण्यास सहमत झाला असल्याचे समोर येत आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat Crime : पोते भरून आलेले पैसे कुठे जिरले? खरातकडे...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महिला भक्तांचे लैंगिक शोषण व कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) आता केंद्रीय यंत्रणांच्या...